पॉर्नच्या व्यसनानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं..., जगप्रसिद्ध गायिकेनं केला SHOCKING खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 16:06 IST
1 / 7ग्रॅमी पुरस्कार विजेती अमेरिकन गायिका बिली एलिश ही जगातील लोकप्रिय गायिकांपैकी एक. पण अलीकडे बिलीनं असा काही खुलासा केला की, सर्वांनाच धक्का बसला.2 / 7होय, पॉर्न पाहण्याच्या व्यसनामुळे मी उद्ध्वस्त झाले, असा शॉकिंग खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला.3 / 7बिलीनं वयाच्या 11 व्या वर्षापासून पॉर्न पाहायला सुरूवात केली आणि बघता बघता तिला याचं व्यसन लागलं. ‘द हॉवर्ड स्टर्न शो’ या रेडिओ कार्यक्रमात बिली या व्यसनावर बोलली.4 / 7बिली याबद्दल म्हणाली, मी सुद्धा खूप ‘कूल’ आहे, केवळ हे लोकांना दाखवण्याच्या नादात मी पॉर्न पाहायला सुरूवात केली आणि याचं व्यसन कधी लागलं हे सुद्धा मला कळलं नाही.5 / 7काही पॉर्न प्रचंड हिंसक असतं, यामुळे रात्री मला भयंकर स्वप्नं पडतं. पॉर्न पाहणं अगदीचं सामान्य आहे, असा सुरूवातीला माझा विचार होता. आता मला माझ्या त्या विचाराची लाज वाटते, चीड येते, असे ती म्हणाली.6 / 7बिली ही आज मोठी गायिका आहेत. जगभर तिचे चाहते आहेत. 2015 साली ‘ओशन आईज’ या गाण्यामुळे ती प्रकाशझोतात आली होती.7 / 7अगदी वयाच्या विशीत असलेल्या बिलीने आत्तापर्यंत एक दोन नव्हे तर सात ग्रॅमी अवार्ड जिंकले आहेत.