Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! बुर्ज खलिफाच्या सर्वात वरच्या टोकावर चढला हा सुपरस्टार, २७२२ फूट उंचीवर काढला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 18:07 IST

1 / 6
हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) हा जगातल्या सर्वात उंच इमारतींपैकी एक बुर्ज खलिफा(Burj Khalifa) च्या सर्वात वरच्या टोकावर चढला होता. स्मिथ एका यूट्यूब सीरिजसाठी दुबईतील बुर्ज खलिफाच्या टोकावर पोहोचला होता. सोशल मीडियावर विल स्मिथचे हे फोटो पाहून त्याचे फॅन्स हैराण झाले आहेत.
2 / 6
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, १६० मजली ही इमारत २,७२२ फूट उंच आहे. ५३ वर्षीय अभिनेता विल स्मिथ याच बिल्डींगच्या वर दिसला. स्मिथ यूट्यू शो 'बेस्ट शेप ऑफ माय लाइफ' एका एपिसोडमध्ये जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या टोकावर चढलेला दिसला.
3 / 6
फोटोत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे विल स्मिथ हात मोकळे सोडून बुर्ज खलिफाच्या टोकावर उभा आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर स्माइलही दिसत आहे. एका दुसऱ्या फोटोत तो इमारतीच्या टोकावर बसलेला दिसतो आहे. स्मिथ शूटसाठी लॉस एंजलिसहून दुबईला आला होता.
4 / 6
विल स्मिथ हा एक अमेरिकन अभिनेता, रॅपर आणि निर्माता आहे. स्मिथला पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि दोन अकादमी अवॉर्डचे नामांकन आहे. त्याने चार वेळा ग्रॅम अवॉर्डही मिळवला आहे.
5 / 6
6 / 6
टॅग्स :हॉलिवूडदुबई