हिंदुस्तानी भाऊने एकता कपूरच्या विरोधात वेबसीरिजसाठी कोर्टात दाखल केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 21:59 IST
1 / 5चित्रपट व टीव्ही निर्माती एकता कपूरच्या विरोधात एका वेबसीरिजमध्ये भारतीय जवानांचा व लष्करी वर्दीचा अपमान केल्यामुळे दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.2 / 5बिग बॉसचा एक्स कंटेस्टंट विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊने मंगळवारी वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.3 / 5पाठकचे वकील काशिफ खान यांनी सांगितले की या प्रकरणाची सुनावणी 24 ऑगस्टला होणार आहे.4 / 5खान यांनी सांगितले की, माझ्या क्लाएंटने एकता कपूर आणि इतर लोकांच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, पण अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.5 / 5त्यांनी सांगितले की, एकता कपूर शिवाय तक्रारीत शोभा कपूर, जितेंद्र कपूर आणि वेब प्लॅटफॉर्म ऑल्ट बालाजीचेदेखील नाव आहे.