Hina Khan : "जे लोक सोडून जातात ते..."; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानचं झालं ब्रेकअप?, पोस्टने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 17:23 IST
1 / 10लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती. 2 / 10कॅन्सरशी लढणारी हिना सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिच्या प्रकृतीची माहिती देत असते. पण आता तिचं बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 3 / 10अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या एका पोस्टमधून देखील तिने तसेच काहीसे संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या चाहत्यांची देखील चिंता वाढली आहे. 4 / 10हिना खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अशी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीची पोस्ट पाहून आता सर्वजण अंदाज लावत आहेत की तिने रॉकीसोबत ब्रेकअप केले आहे. 5 / 10हिनाच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “जर मी आयुष्यात काही शिकले असेल तर ते असं आहे की, जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते तुम्हाला कधीही अर्ध्यावर सोडून जात नाहीत. जे लोक सोडून जातात ते आपला वापर करत असतात.'6 / 10हिनाची ही पोस्ट पाहून आता तिचे चाहतेही हैराण आणि नाराज झाले आहेत. अभिनेत्रीच्या या कठीण काळात तिचा प्रियकर रॉकी जैस्वाल तिला सोडून गेला आहे, असा सगळ्यांनाच वाटत आहे. 7 / 10हिनाने पोस्टमध्ये कोणाचंही नाव लिहिलेलं नाही किंवा रॉकीची देखील यावर कोणतीही प्रतिक्रियाही समोर आलेली नाही. त्यामुळे नेमकं दोघांमध्ये काय चाललं आहे याची चर्चा रंगली आहे. 8 / 10याआधीही हिना आणि रॉकीचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण त्यानंतर रॉकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हिनाचे काही फोटो शेअर केले आणि अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला.9 / 10हिना खान आणि रॉकी जैस्वाल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची भेट हिनाचा पहिला शो 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या सेटवर झाली होती. इथून दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले.10 / 10