Year End 2024: कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक? केवळ १० मिनिटांसाठी घेतले २० कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:22 IST
1 / 8२०२४ या सरत्या वर्षात कोणकोणत्या खलनायकांनी बॉक्सऑफिस गाजवलं माहितीये का? बॉबी देओल ते आर माधवन यांनी पडद्यावर खलनायक साकारत कोट्यवधींची कमाई केली. कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक?2 / 8दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमात चर्चा झाली ती अर्जुन कपूरची (Arjun Kapoor). अर्जुनने यामध्ये 'डेंजर लंका' ची खलनायकी भूमिका साकारली. यासाठी त्याने ६ कोटी रुपये घेतले.3 / 8या वर्षात आर माधवनेही (R Madhavan) 'शैतान' सिनेमात खलनायक साकारला. अजय देवगणसमोर त्याने साकारलेला खलनायक खरोखर घाबरवणारा होता. यासाठी आर माधवनला १० कोटी रुपये मिळाले.4 / 8सैफ अली खानने (Saif Ali Khan) यंदाच्या वर्षात 'देवारा' या दाक्षिणात्य सिनेमात व्हिलनची भूमिका केली. ज्युनिअर एनटीआर सिनेमात हिरो होता. सैफने या सिनेमासाठी तब्बल १३ कोटी मानधन घेतलं.5 / 8अक्षय कुमारचा या वर्षातला फ्लॉप सिनेमा म्हणजे 'बडे मियां छोटे मियां'. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) खलनायक होता. त्याने ५ कोटी रुपये आकारले होते.6 / 8खलनायकांच्या यादीत 'अॅनिमल' फेम बॉबी देओलही (Bobby Deol) येतो. त्याने सूर्याच्या 'कंगुआ' या दाक्षिणात्य सिनेमात खलनायकाची भूमिका केली. यासाठी त्याने ५ कोटी रुपये घेतले.7 / 8दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सर्वात चर्चेतला आणि नुकताच रिलीज झालेला 'पुष्पा २: द रुल'. अल्लू अर्जुनप्रमाणेच अभिनेता फहाद फासिलच्या (Fahadh Faasil) व्हिलनगिरीसाठी चाहते उत्सुक होते. फहाद फासिलने यासाठी तब्बल ८ कोटी रुपये आकारले.8 / 8या सर्व खलनायकांच्या यादीत आणखी एकाचं नाव येतं ते म्हणते कमल हसन (Kamal Haasan). त्यांनी 'कल्कि २८९८ एडी' या १००० कोटींच्या सिनेमात यास्किनची भूमिका साकारली. त्यांची भूमिका केवळ १० मिनिटांची होती तरी त्यांनी तब्बल २० कोटी मानधन घेतलं. यासोबतच ते २०२४ वर्षातले सर्वात महागडे खलनायक ठरले आहेत.