By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 19:41 IST
1 / 11बॉलिवूडमध्ये स्वत:च्या सौंदर्य आणि टॅलेंटवर वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री दिशा पटानी हिचा आज वाढदिवस आहे. १३ जून १९९२ रोजी दिशाचा जन्म झाला होता. दिशाच्या वाढदिवशी आपण तिच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया जे आतापर्यंत कधीच समोर आलं नाही. 2 / 11दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९२ मध्ये उत्तराखंडच्या पिथोरागड येथे झाला. त्यानंतर दिशा उत्तर प्रदेशातील बरेली इथं कुटुंबासोबत राहत होती. तिच्या वडिलांचे नाव जगदिश सिंह पटानी आहे. ते डीएसपी अधिकारी होते. 3 / 11दिशाची एक मोठी बहीण आहे तिचं नाव खुशबू पटानी. दिशा पटानी एमिटी यूनिवर्सिटी, नोएडा येऊन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगमधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. 4 / 11दिशा पटानीने तिच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. २०१४ मध्ये पौंडच्या फेमिना मिस इंडियामध्ये तिने भाग घेतला. जिथे तिला फर्स्ट रनर अप पुरस्कार मिळाला. त्यानंतर दिशाची ओळख वाढतच गेली. दिशाने कॅडबरी डेअरी मिल्कमध्येही प्रचार केला. 5 / 11दिशाने सिनेमातील करिअरची सुरुवात २०१५ मध्ये दक्षिण भारतातील प्रसिद्ध दिग्दर्शक जगन्नाथ पुरी यांचा सिनेमा लोफरपासून केली होती. ज्याठिकाणी ते वरूण तेजसोबत दिसली. या सिनेमात तिने हैदराबादमधील एका मुलीची भूमिका साकारली. त्यानंतर दिशाच्या करिअरमध्ये काही विशेष बदल झाला नाही. 6 / 11दिशा पटानीला २०१६ भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी यांच्या बायोपिक सिनेमा धोनी एन अनटोल्ड स्टोरीत काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात महेंद्र सिंग धोनची पहिली प्रेयसी प्रियंका हिची भूमिका तिने केली होती. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. 7 / 11दिशा पटानी हिला धोनी एन अनटोल्ड स्टोरी या सिनेमासाठी स्क्रीन अवार्डमध्ये बेस्ट डेब्यू या पुरस्काराने सन्मानित केले होते. 8 / 11सिनेमाशिवाय दिशा पटानी तिच्या अफेअरमुळेही चर्चेत आली. दिशा पटानी टीव्हीतील प्रसिद्ध अभिनेते पार्थ समथानला डेट करत होती. तिच्या मॉडेलिंगच्या करिअरमध्ये दिशाने जवळपास १ वर्ष पार्थ समथानला डेट केले. त्यानंतर अचानक या दोघांमध्ये ब्रेक अप झाला. 9 / 11पार्थसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा टायगर श्रॉफसोबत दिसली. खूप काळ दिशा टायगर श्रॉफला डेट करत होती. परंतु या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नाही. 10 / 11माहितीनुसार दिशा मुंबईत केवळ ५०० रुपये घेऊन आली होती. ती म्हणते की, मी एकटी राहत होती. काम करत होती परंतु कधीही कुटुंबाकडे मदत मागितली नाही. 11 / 11दिशाने मुंबईतील वांद्रे येथे स्वत:चं घर घेतलं. २०१७ मध्ये दिशाने स्वत:लाच हे गिफ्ट दिलं होतं. दिशा पटानीच्या या घराचं नाव लिटिल हट असं आहे ज्याची किंमत ५ कोटी रुपये आहे.