By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 06:00 IST
1 / 8वनिता खरात आणि सुमीत लोंढे ही जोडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २ फेब्रुवारीला ही जोडी विवाहबंधनात अडकली. 2 / 8अभिनेता समीर चौघुलेच्या पत्नीचं नाव कविता आहे. समीर आणि कविता यांच्या लग्नाला लवकरच २५ वर्षे पूर्ण होतील. कविताच्या पाठिंब्यामुळेच आपण इथपर्यंत टिकून असल्याचे समीर अनेकदा सांगतो.3 / 8अभिनेत्री चेतना भट्टने मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारे गीतकार-लेखक मंदार चोळकर यांच्याशी लग्न केले आहे.4 / 8प्रसाद खांडेकर आणि अल्पा खांडेकर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. प्रसादला श्लोक नावाचा मुलगाही आहे.5 / 8नम्रता संभेराव हिचा योगेशसोबत ८ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दोघांनाही एका मुलगा असून त्याचे नाव रुद्राज असे आहे.6 / 8 'कॉमेडी क्वीन' विशाखा सुभेदारचा नवरा अभिनेता महेश सुभेदार आहे. या जोडप्याला एक मुलगाही आहे. विशाखा अनेकदा आपल्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.7 / 8प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. या दोघांनाही दोन मुले आहेत. मंजीरीसुद्धा आता प्रसादच्या कामात त्याला मदत करत असते.8 / 8महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची परीक्षक सई ताम्हणकरला अखेर तिचा खऱ्या आयुष्यातला जोडीदार मिळाला आहे. सई गेल्या काही दिवसांपासून अनीश जोगला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर अनीशसोबतचे फोटो शेअर केले आणि आपले नाते अधिकृत केले.