Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सहकुटुंब सहपरिवार'मधील सूर्याच्या रिअल लाइफमधील पत्नीला पाहिलंत का?, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 13:16 IST

1 / 10
स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. तसेच या मालिकेतील सर्व पात्रांना देखील चाहत्यांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत सूर्याची भूमिका अभिनेता सुनील बर्वे याने साकारली आहे. त्याने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे.
2 / 10
सुनील बर्वेच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. सुनीलची पत्नी अपर्णा बर्वे हिचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्याने सोशल मीडियावरील केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
3 / 10
अभिनेता सुनील बर्वेने पत्नी अपर्णा बर्वेचा फोटो शेअर करत लिहिले की, अगदी वेळेवर, तुझा वाढदिवस तुझ्यासोबत छान साजरा केला, नेटवर्क कव्हरेजपासून दूर राहिल्याबद्दल आनंद झाला, तरीही तुम्ही तो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पाहेपर्यंत पुढच्या वर्षात पाऊल टाकणार नाही, म्हणून तुला सुंदर, चैतन्यपूर्ण, भरभरून शुभेच्छा देतो. हिरव्यागार वाढदिवस प्रिय! तुम हो तो हम है! खूप प्रेम!
4 / 10
अभिनेत्याच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहेत. चाहत्यांसह सेलिब्रेटी त्याच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
5 / 10
सुनील बर्वे आणि अपर्णा यांचे लव्ह मॅरेज आहे.
6 / 10
सुनील बर्वे आणि अपर्णा बर्वे हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असून ते एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात.
7 / 10
सुनील बर्वे आणि अपर्णा यांची लव्ह स्टोरी हटके आहे. पहिल्याच नजरेत अभिनेता अपर्णा यांच्या प्रेमात पडला.
8 / 10
कॉलेज बाहेरील हॉटेलमध्ये अपर्णा यांना पाहिलं आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा अपर्णा यांनी नकार दिला.
9 / 10
कशीबशी ओळख वाढवत सुनीलने अपर्णा यांच्यासोबत मैत्री केली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि मग लग्न केले.
10 / 10
सुनील बर्वे आणि अपर्णा यांना सानिका आणि अथर्व अशी दोन मुले आहेत.
टॅग्स :सुनील बर्वेस्टार प्रवाह