By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 18:55 IST
1 / 11झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची केमिस्ट्री सर्वांना खूप भावते. सध्या या मालिकेतील कलाकारांच्या रिअल लाइफ पार्टनरची चर्चा रंगताना दिसते. त्यामुळे या कलाकारांचे जोडीदार कोण ते पाहुयात.2 / 11 आजोबा- 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत जगन्नाथ चौधरींची भूमिका जेष्ठ अभिनेते प्रदीप वेलवणकर साकारत आहेत.3 / 11प्रदीप वेलवणकर यांचं लग्न रजनी वेलणकर यांच्यासोबत झालं आहे. 4 / 11यश- बॉलिवूडमधील अभिनेता श्रेयस तळपदेने बऱ्याच वर्षांनी या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री केली आहे. श्रेयस या मालिकेत यशची भूमिका साकारतो आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 11श्रेयसच्या पत्नीचं नाव दीप्ती तळपदे आहे. ३१ डिसेंबर २००४ साली दीप्ती आणि श्रेयस यांचे लग्न पार पडले. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 11नेहा - या मालिकेत ती नेहा कामतची भूमिका प्रार्थना बेहेरे साकारते आहे. लग्नानंतर पंजाबी ड्रेसमध्ये दिसणारी नेहा आता साडीमध्ये दिसते.(फोटो इन्स्टाग्राम)7 / 11प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. लेखक, दिग्दर्शक अशीही त्याची ओळख आहे. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 11समीर - समीर ही भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे साकारतो आहे. समीर आणि यशची मैत्री प्रेक्षकांनाही भावते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)9 / 11संकर्षणची पत्नी नाव शलाका पांडे आहे. संकर्षण आणि शलाका यांंना दोन जुळी मुलं आहेत. (फोटो इन्स्टाग्राम) 10 / 11शेफाली - मालिकेतील नेहाची सहकारी आणि जवळची मैत्रीण शेफाली या पात्रानेदेखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे साकारते आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 11 / 11काजल काटेने प्रतिक कदम सोबत लग्नगाठ बांधली आहे. प्रतिक मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहातो आहे. (फोटो इन्स्टाग्राम)