Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरने या ब्लॉकबस्टर सिनेमांना दिला होता नकार, म्हणतो 'आजही वाटते खंत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:19 IST

1 / 10
शाहिद कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात हॅन्ड्सम अभिनेत्यांपैकी एक आहे. आज शाहिद कपूर त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. |
2 / 10
एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा शाहिद कपूर सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये चॉकलेट बॉय समजला जात होता.
3 / 10
नंतर अभिनेत्याने अनेक प्रकारच्या भूमिका साकारत आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे.
4 / 10
परंतु शाहिद कपूरने आपल्या या २० वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक चांगले चित्रपट गमावल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. आणि या गोष्टीची त्याला आयुष्यभर खंतसुद्धा राहणार असल्याचं मान्य केलं आहे.
5 / 10
रंग दे बसंती- फारच कमी लोकांना माहिती असेल की, शाहिद कपूरला 'रंग दे बसंती' चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्याला सिद्धार्थच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. ही भूमिका त्याला प्रचंड आवडली होती. परंतु बिझी शेड्युलमुळे या चित्रपटाला त्याला वेळ देणं शक्य झालं नाही म्हणून त्याने नकार दिला होता.
6 / 10
रॉकस्टार- रणबीर कपूरआधी या चित्रपटासाठी शाहिद कपूरला विचारण्यात आलं होतं. परंतु इम्तियाज अलीने शाहिदला रॉकस्टार आणि जब वी मेट या दोन्हींमधील एक चित्रपट निवडण्यास सांगितलं होतं. त्यावेळी शाहिदने जब वी मेट निवडला होता.
7 / 10
द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट- 2012मध्ये आलेल्या मीरा नायर यांच्या या चित्रपटासाठी शाहिद कपूरला ऑफर देण्यात आली होती.परंतु आधीच 'मौसम' साईन केल्याने त्याने नकार दिला होता.
8 / 10
शुद्ध देशी रोमान्स- या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आधी शाहिद कपूरला विचारणा झाली होती. परंतु त्याने नकार दिला होता.
9 / 10
बँग-बॅंग- या चित्रपटात हृतिक रोशनच्या आधी शाहिद कपूरला घेण्यात येणार होतं. परंतु शाहिद कपूर 'हैदर' मध्ये व्यस्त असल्याने त्याने नकार दिला होता.
10 / 10
रांझना- सोनम कपूर आणि धनुषच्या या चित्रपटासाठी आधी शाहिद कपूरला ऑफर देण्यात आली होती. परंतु त्याने नकार दिल्याने याठिकाणी धनुषची वर्णी लागली होती.
टॅग्स :बॉलिवूडशाहिद कपूर