By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 11:25 IST
1 / 7नेहाने लहान असतानाच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.१९९९ च्या प्यार कोई खेल नही या चित्रपटात तिने बालकलाकाराची भुमिका केली होती. त्यानंतर ती दीवाने, देवदास या सिनेमांमध्येही दिसली.2 / 7कॅप्टन हाऊस या एकता कपुरच्या मालिकेतुन तिने टेलिव्हिजन मध्ये पदार्पण केले. तिने मराठी, हिंदी, तमिल, तेलगु, मल्याळम मध्येही काम केले आहे. 3 / 7भाग्यलक्ष्मी मध्ये केलेल्या तिच्या भुमिकेचे खुप कौतुक झाले. या मालिकेतुन ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने अनेक मालिका, चित्रपटांत काम केले.4 / 7नेहा ने सलमान खानच्या बिग बॉस १२ मध्येही एंट्री घेतली होती. त्यातही तिने आपली ठसा उमटवला होता. मात्र ती पहिल्याच राऊंड मध्ये एलिमिनेट झाली होती. 5 / 7अलिकडच्या काळात नेहाच्या दोन भुमिका गाजल्या. मे आय कम इन मॅडम आणि भाभीजी घर पर है या दोन्ही मालिकांमुळे ती प्रकाशझोतात आली. या मालिकेतील तिच्या कामाला प्रेक्षकांनी खुप पसंत केले. 6 / 7मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'जून' या चित्रपटात नेहा ने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. यामध्ये ती सिद्धार्थ मेनन सोबत तिची जोडी खुप पसंत केली.7 / 7२०२० मध्ये नेहाने बॉयफ्रेंड 'शार्दुल बायस' सोबत लग्न केले. त्यांचे लग्न हा देखील चर्चेचा विषय होता. शार्दुलचा आधी दोन वेळा घटस्फोट झाला होता. त्याला एक मुलगी सुद्धा आहे. यावरुन नेहाला ट्रोल केले होते.