Join us

माझा नवरा अजिबात रोमॅन्टिक नाही पण...; काजोल - अजयची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 13:35 IST

1 / 10
आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. आज काजोलचा वाढदिवस. अभिनेत्री तनुजा समर्थ आणि शोमू मुखर्जी यांची लेक असलेल्या काजोलने 1992 साली ‘बेखुदी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती शाहरुख खान स्टारर ‘बाजीगर’ या चित्रपटाने.
2 / 10
‘प्यार किया तो डरना क्या’, ‘हम आपके दिल में रेहते है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारखे अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर आहेत. 5 आॅगस्ट 1974 ला जन्मलेल्या काजोलने ‘बेखुदी’ सिनेमा साईन केला तेव्हा ती 16 वर्षांची होती. त्यावेळी शाळेत शिकत होती. पण करिअरसाठी तिने शाळा सोडली.
3 / 10
करिअरच्या शिखरावर असतानाच काजोल अजय देवगणच्या प्रेमात पडली. सामान्यत: कोणत्याही प्रेमसंबंधात मुलगा मुलीला प्रपोज करतो. पण इथे उलट होतं. काजोलने अजयला प्रपोज केलं होतं.
4 / 10
अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती ‘हलचल’ सिनेमाच्या सेटवर. पहिल्या भेटीत काजोलला वाटलं होतं की अजय फार घमंडी आहे. पण नंतर तिचा भ्रम दूर झाला आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.
5 / 10
असे म्हणतात की, काजोल तिच्या बॉयफ्रेन्डबाबतचे सल्ले अजयकडून घेत होती. दोघे चांगले मित्र होते. पण दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले त्यांनाही समजले नाही. दोघांना फक्त सोबत रहायचं होतं.
6 / 10
नेहा धुपियाच्या रेडिओ शोमध्ये काजोलने सांगितले होते की, ‘कुणाचीही इच्छा नव्हती की मी अजयसोबत लग्न करावं. माझ्या परिवारातील लोक फार कन्फ्यूज होते. जेव्हा मी वडिलांना सांगितले की, मला अजयससोबत लग्न करायचंय. तर ते माझ्याशी एक आठवडा बोलले नव्हते. माझ्या परिवारातील लोकांना वाटत होतं की, लग्नासाठी माझं वय लहान आहे. पण मी माझ्या विचारावर अडून राहिले’.
7 / 10
काजोलने तिच्या हनीमूनबाबतही काही किस्से शेअर केले होते. तिने सांगितले होते की, मी अजयसोबत शर्यत लावली होती. आपण 2 महिन्यांसाठी हनीमूनवर जाऊ, असे मी त्याला म्हणाले होते. ऑस्ट्रेलिया लास वेगास आणि इतरही काही ठिकाणी फिरल्यावर आम्ही 40 दिवसांनी ग्रीसला पोहोचलो.
8 / 10
पुढे त्याने सांगितले, अजय फार थकलेला होता. एका सकाळी अजय झोपेतून उठून बोलला की, त्याला ताप आहे आणि जोरात डोकंही दुखतंय. मी म्हणाले, तुला औषध देते, पण अजयचा घरी चलचा तगादा सुरू होता. अशात आम्ही हनीमून मधेच सोडून मुंबईला परत आलो.
9 / 10
काजोल ख-या आयुष्यात अतिशय बडबडी आहे. याऊलट अजय स्वभावाने अतिशय अबोल. याशिवाय अजय देवगण अजिबात रोमॅण्टिक नसल्याचे काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते.
10 / 10
गुलाब घेऊन येणे किंवा लग्नाच्या वाढदिवसाला काही सरप्राईज देणे हा अजयचा स्वभाव नाही. मात्र त्याचे माझ्यावर आणि त्याच्या कुटुंबावर खुप प्रेम आहे. त्याचे प्रेम पदोपदी जाणवते, असे काजोल म्हणाली होती.
टॅग्स :काजोलअजय देवगण