Join us

Ganeshotsav: पती राज कुंद्राविना गणपती आणण्यासाठी आली शिल्पा शेट्टी, चेहऱ्यावर होते असे भाव, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:32 IST

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरी दरवर्षी धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र काही दिवसांपूर्वी शिल्पाचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आल्याने शिल्पाचे कुटुंब तणावातून जात आहे. अशा परिस्थितीतही शिल्पा शेट्टी हिने गणेशोत्सव साजरा करण्यात खंड न पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
2 / 9
शिल्पाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपतीची मूर्ती घरी आणली आहे. विघ्नहर्ता अशी गणपतीची ओळख आहे. त्यामुळे तिच्यावरील सर्व विघ्ने आणि दु:ख गणपतीने दूर करावीत, अशी तिची प्रार्थना असेल.
3 / 9
गणपतीची मूर्ती घरी आणतानाची शिल्पा शेट्टी हिची छायाचित्रे समोर आली आहेत. खासजी आयुष्यात प्रचंड तणाव असूनही शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपतीला घरी आणताना शिल्पा उत्साहित दिसत होती.
4 / 9
यावर्षी शुक्रवारी गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्त शिल्पा गणपतीची मूर्ती आणण्यासाठी लालबाग येथे आली होती. यावेळी तिने फोटोग्राफर्सना काही पोझ सुद्धा दिल्या.
5 / 9
दरवर्षी शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती आणताना आणि त्याचे विसर्जन करताना तिचा पती राज कुंद्रा हा उपस्थित असतो. मात्र यावेळी राज कुंद्राच्या अनुपस्थितीत शिल्पाच सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत होती.
6 / 9
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर अश्लील चित्रपट तयार केल्याचा आरोप झाला आहे. त्याप्रकरणी त्याला अटक झाली असून, तो सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच या प्रकरणात पोलिसांनी शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली आहे.
7 / 9
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शिल्पा शेट्टी हिला क्लीन चिट दिली आहे. पोलिसांसमोर शिल्पाने पतीचा बचाव केला होता. ते एरॉटिक चित्रपट बनवतात पोर्न फिल्म नाही, असे ती म्हणाली होती
8 / 9
राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पाने स्वत:ला लो प्रोफाईल ठेवले आहे. शिल्पाने तीन आठवड्यापर्यंत रियालिटी शो सुपर डान्सर ४ मधून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती पुन्हा वर्कमोडवर आली आहे.
9 / 9
लालबाबमध्ये गणपतीची मूर्ती आणण्यासाठी जाताना शिल्पा शेट्टी
टॅग्स :शिल्पा शेट्टीगणेशोत्सवमुंबई