'आई कुठे काय करते'मधील अनघानं या चित्रपटांमध्ये केलंय काम, जाणून घ्या तिच्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 07:00 IST
1 / 9छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका लोकप्रिय मालिका ठरली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. त्यात या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेचादेखील खूप फॅन फॉलोव्हिंग आहे.2 / 9अश्विनीचा जन्म २७ ऑक्टोबर १९९० मध्ये झाला असुन ती मुळची साताऱ्यातील वाई येथील आहे. तिने तिच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे वाईतच पूर्ण झालंय. किसन वीर महाविद्यालयातून तिने वाणिज्य शाखेत शिक्षण घेतलंय. तसेच तिने हॉटेल मॅनेजमेंट देखील केलंय.3 / 9२०१४ मध्ये झी मराठी वरील ‘अस्मिता’ ही तिची पहिली मालिका. त्यानंतर तिनं ‘स्वराज रक्षक संभाजी’ या मालिकेत राणू अक्काची भूमिका साकारली होती.. तिच्या या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 4 / 9त्यांनंतर तिने ‘चला हवा येऊ द्या’ सेलिब्रेटी पॅटर्न या रिएलिटी शोमध्ये काम केले.5 / 9या सोबतच टपाल आणि बॉईज या सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. २०१८ मध्ये तिला गावकडील गोष्टी या वेबसीरिजसाठी प्रेरणा पुरस्कार देखील मिळाला आहे.6 / 9इतकेच नव्हे तर तिने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील सुरु केले आहे. मोरया प्रॉडक्शन असं तिच्या प्रॉडक्शन हाऊसच नाव आहे.7 / 9अश्विनी महांगडे ही अभिनेत्री सोबतच एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून देखील काम करते आहे. 8 / 9अश्विनीने रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन हॉटेलची निर्मिती देखील केली आहे.9 / 9