अखेर सलमान खानचं लग्न न करण्यामागचं कारण आलं समोर, म्हणाला - स्वत:च्या इच्छेनं नाही, तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 06:00 IST
1 / 8बॉलिवूडचा दबंग खान सलमान (Salman Khan)ने त्याच्या आयुष्यात अनेक मुलींना डेट केले. त्याच्या प्रेमात आजही अनेक मुली वेड्या आहेत. मात्र, तरीही सलमान सेटल होऊ शकला नाही. 2 / 8सलमानच्या लव्ह लाईफमध्ये जेवढे ट्विस्ट आणि टर्न आले तेवढे क्वचित कोणाच्या आयुष्यात आले असतील. मात्र, आता भाईजान लग्न करणार नाही का? हा प्रश्न कायम आहे. कारण आजही सलमान लग्न कधी करणार? असा प्रश्न आहेच. 3 / 8पण एकीकडे लग्न न करता राहणे सलमानला आवडत नाही, हे त्याच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यातून समोर येत आहे. तो इतकी वर्षे एकटा का राहिला त्याचा खुलासा त्याने केला आहे. 4 / 8'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) या रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. त्यावेळी टॉप ५ स्पर्धकांमधली शालीन भनोट (Shalin Bhanot) शोमधून बाहेर आला आणि सलमान खानने त्याच्यासोबत खूप मस्ती केली. 5 / 8यावेळी मस्ती करत शालीन म्हणाला की त्याला सलमान खानकडून काही तरी शिकायला मिळाले आहे. शालीन म्हणाला की तो आता सलमानसारखे एकटा राहण्याचा विचार करत आहे. 6 / 8यावेळी शालीनला सलमान असं काही म्हणाला की त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला की ज्यामुळे लोकांना असे वाटायला लागले की सलमानला कदाचित आयुष्यात सेटल व्हायचे आहे. सलमान म्हणाला, 'मी माझ्या इच्छेनं सिंगल नाही.'7 / 8सलमान खाननं बऱ्याच अभिनेत्रींना डेट केलं आहे. 8 / 8त्यामध्ये अभिनेत्री संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, यूलिया वंतूरसारख्या अनेक कलाकारांची नावे होती.