Join us  

ब्रेक के बाद! नवीन वर्ष ठरणार खास, मोठ्या पडद्यावर परतणार 'हे' बॉलिवूड स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 4:27 PM

1 / 7
सन 2023 मध्ये अनेक बॉलिवूड कलाकार दीर्घ काळानंतर पडद्यावर परतले. यामध्ये शाहरुख खानचा समावेश आहे. त्याने 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' सारखे चित्रपट दिले.
2 / 7
सनी देओलच्या 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. बॉबी देओलने 'अॅनिमल' चित्रपटात आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. तर येत्या 2024 मध्येही असे अनेक कलाकार आहेत, जे बऱ्याच दिवसांनी पडद्यावर पुनरागमन करणार आहेत.
3 / 7
70 च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकांची मने जिंकणारी झीनत अमान 2024 साली 'बन टिक्की' या चित्रपटात दिसणार आहे.
4 / 7
झायेद खानही तब्बल 9 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
5 / 7
फरदीन खान तब्बल 14 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. तो रितेश देशमुखसोबत 'विसफोट' या चित्रपटात दिसणार आहे.
6 / 7
'मेरे ब्रदर की दुल्हन' सारखे हिट चित्रपट देणारा इम्रान खान तब्बल 9 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
7 / 7
साहिल खानही तब्बल १३ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीझीनत अमानइम्रान खानफरदीन खानशाहरुख खानबॉबी देओलसनी देओल