सारा तेंडुलकरने शेअर केले इव्हिनिंग वॉकचे फोटो, फॅन्स म्हणाले हे तर वॉलपेपरसारखे दिसताहेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 00:00 IST
1 / 6मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर ही सध्या गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. सारा ही सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 2 / 6सारा तेंडुलकरने गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करताना एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन सनसेट वॉक अशी कॅप्शन दिली आहे. म्हणजेच सारा तेंडुलकर इव्हिनिंग वॉकसाठी गेली होती. तिने तिचे दोन फोटो शेअर केले. त्यामध्ये एका फोटोमध्ये सारासोबत तिचा कुत्राही दिसत आहे. 3 / 6सारा तेंडुलकरच्या पोस्टवर युझर्सकडून गमतीदार कमेंट केल्या जात आहेत. कुणी तिचं कौतुक केलंय. तर कुणी तिला ट्रोल केलं आहे. यामध्ये एका फॅन्सने लिहिलं की, हा फोटो एकदम वॉलपेपरप्रमाणे दिसत आहे. तर अजून एका युझरने साराला मोस्ट ब्युटीफूल म्हटलं आहे. 4 / 6सारा तेंडुलकर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या खूप चर्चा सुरू आहे. मात्र आतापर्यंत त्याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र तिची मॉडेलिंगमध्ये एंट्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर झाला होता. 5 / 6तर सारा तेंडुलकरचा एक अजून फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती बॉलिवूड गायिका कनिका कपूरसोबत दिसत आहे. सारा सोशल मीडियावर चमकत आहे. 6 / 6काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर हिने इन्स्टाग्रामवर गोव्यातील पहिला फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ती ब्ल्यू ड्रेसमध्ये दिसत होती. तिने हातात फुलांचा गुच्छ घेतला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने केवळ हॅलो गोवा, असे लिहिले होते.