Join us

लाल टोपी, सफेद दाढी अन् हातात जिंगल बेल, सांताच्या लूकमधील या अभिनेत्रीला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:46 IST

1 / 7
सध्या सगळीकडे ख्रिसमसचा माहौल आहे. हे वर्ष संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे.
2 / 7
अनेक मालिकांमध्ये ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन दाखविण्यात येणार आहे. एका अभिनेत्रीचा सांताक्लॉजच्या लूकमधील फोटो समोर आला आहे.
3 / 7
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने सांताक्लॉज सारखे लाल रंगाचे कपडे घातले आहेत. डोक्यावर लाल टोपी, पांढरी दाढी आणि हातात जिंगल बेल असल्याचं दिसत आहे.
4 / 7
सांताच्या लूकमधील या अभिनेत्रीला ओळखणं कठीण झालं आहे. ही अभिनेत्री म्हणजे सानिका मोजार आहे.
5 / 7
सानिका सध्या लय आवडतेस तू मला या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
6 / 7
या मालिकेत ती सानिका पाटील हे पात्र साकारत असून तिला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
7 / 7
सानिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती रील व्हिडिओही शेअर करते.
टॅग्स :टिव्ही कलाकारनाताळ