Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या २१ वर्षांनी पत्नीला दिला घटस्फोट, २ मुलं झाली तरी गर्लफ्रेंडशी केलं नाही लग्न, अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 11:33 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तसेच तो त्याच्या पर्सनल लाइफमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतो.
2 / 10
अर्जुनचं पहिलं लग्न मॉडेल मेहर जेसियासोबत झाले होते. मग लग्नाच्या २० वर्षांनंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
3 / 10
मेहर आणि अर्जुनला दोन मुली आहेत आणि आता तो मॉडेल ग्रॅब्रिएलाला डेट करतो आहे. तिच्यासोबत तो लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतो आहे.
4 / 10
अर्जुन रामपाल आणि मेहर यांच्या घटस्फोटाला बराच काळ उलटून गेला आहे आणि कित्येक वर्षांनंतर अर्जुन घटस्फोटावर बोलला आहे.
5 / 10
अर्जुन रामपाल द रणवीर शोमध्ये आला होता. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले. तो म्हणाला की, मी खूप लवकर लग्न केले जे करायला नको होते.
6 / 10
अर्जुनने रणवीरसोबत बोलताना सांगितले की, तुम्ही नाते तुटल्याचा आरोप कोणा एकावर नाही करू शकत. ज्या चुका झाल्या आहेत, त्यावर विचार करणं गरजेचं आहे.
7 / 10
सर्व बंद करून स्वतःबद्दल विचार कराल तेव्हा स्वतःमध्ये अनेक कमतरता दिसतील. आपल्या सोबत दुसऱ्या व्यक्तीच्या कमतरतेबद्दलही समजेल. मात्र नात्यात तुम्हालाच सर्वकाही ठीक करायचे आहे, असे अर्जुन सांगतो.
8 / 10
अर्जुन आणि मेहरने १९९८मध्ये लग्न केले होते. लवकर लग्न करण्याबद्दल अर्जुन म्हणाला की, लग्नासाठी २०-३० वय खूप कमी आहे. मी वयाच्या २४व्या वर्षी लग्न केले, जे खूप लवकर केले होते. पुरूष स्त्रियांच्या तुलनेत हळूहळू मॅच्युअर होतात आणि हे सिद्ध झालंय की आपण पुरूष मुर्ख असतो.
9 / 10
अर्जुन त्याचे लग्न तुटले त्यासाठी स्वतःला जबाबदार मानतो. तो सांगतो की, मेहरसोबत घटस्फोट घेणं खूप कठीण होतं कारण त्या सर्वांचा परिणाम मुलांवर होतो. मेहर आणि अर्जुनला दोन मुली आहेत. ज्यांच्यासोबत तो वेळ व्यतित करताना दिसतो.
10 / 10
अर्जुन रामपालने १४ वर्ष लहान मॉडेल ग्रॅबिएलाला डेट करत आहे. त्या दोघांना दोन मुलं आहेत. त्या दोघांनी अद्याप लग्न केले नाही. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात.
टॅग्स :अर्जुन रामपालगॅब्रिएला डेमेट्रिएड्स