1 / 10नव्वदच्या दशकातील या अभिनेत्रीला ओळखलंत का? नाही ना..तर ही दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आहे. 2 / 10अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीने बॉलिवूडला अलविदा केले आहे आणि ती भारत सोडून विदेशात स्थायिक झाली आहे. 3 / 10मिनाक्षी शेषाद्री नव्वदीच्या काळात अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. 4 / 10मिनाक्षी शेषाद्री सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या या फोटोंमध्ये तिचे वाढलेले वय दिसून येत आहे. 5 / 10मिनाक्षी शेषाद्रीने अनेक सिनेमात मुख्य भूमिका केल्या आहेत. तिच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. एक अभिनय क्षेत्रात येण्याआधी तिने मिस इंडिया हा किताब मिळवला होता.6 / 10तिचे खरे नाव हे शशिकला शेषाद्री असून मिस इंडिया बनल्यानंतर तिचे फोटो सगळ्या वर्तमानपत्रात छापून आले होते. हे फोटो मनोज कुमार यांनी पाहिल्यानंतर त्यांनी तिला पेंटर बाबू या चित्रपटासाठी विचारले आणि अशाप्रकारे मिनाक्षीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले. पण शशिकला नावाची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असल्यामुळे शशिकलाचे नाव बदलून मिनाक्षी ठेवण्यात आले.7 / 10पेंटर बाबू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पण या चित्रपटामुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. हिरो या चित्रपटानंतर तिचे करियर संपूर्णपणे बदलून गेले.8 / 10बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये मिनाक्षीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे.9 / 10मीनाक्षी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर जात संसारात रमली आहे. ती बऱ्याच मोठ्या कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.10 / 10घातक या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. यानंतरही तिला अनेक भूमिकांच्या ऑफर आल्या. पण एका व्यक्तीच्या भीतीमुळे तिने सगळ्या ऑफर्स नाकारल्या. रातोरात सगळं काही सोडून परदेशी रवाना झाली. त्यानंतर ती कधीच भारतात परतली नाही.