Join us

अलका कुबल यांच्या पतीला पाहिलंत का?, त्यांचा ही आहे मराठीसिनेसृष्टीशी जवळचा संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 10:16 IST

1 / 9
सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. ज्येष्ठ अलका कुबल यांचे पती ही सिनेक्षेत्राशी संबधीत आहे. (Photo Instagram)
2 / 9
अलका कुबल यांचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत. (Photo Instagram)
3 / 9
सून, लेक अशा व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांनी रसिकांना कधी हसवलं तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणलं. माहेरच्या साडी हा सिनेमात तर इतका गाजला की घराघरात अलका कुबल यांनी प्रसिद्धी मिळाली. शहरातच नाही तर खेड्यापाड्यात त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला. (Photo Instagram)
4 / 9
मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'माहेरची साडी' या सिनेमाला प्रदर्शित होवून बरेच वर्ष झाले असले तरी सिनेमाची जादू आजही रसिकांच्या मनात कायम आहे. (Photo Instagram)
5 / 9
'माहेरची साडी' सिनेमामुळे अलका कुबल या रसिकांची आवडती अभिनेत्री बनल्या होत्या. अलका कुबल हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत जाऊन पोहोचले.(Photo Instagram)
6 / 9
आजही अलका कुबल यांचे नाव काढताच माहेरची साडी रसिकांना नाही आठवला तर नवलच. त्यांच्या फिल्मी करिअर प्रमाणे खासगी आयुष्याविषयीही जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांच्याशी लग्न करत संसार थाटला.(Photo Instagram)
7 / 9
दोघांचे लव्हमॅरेज आहे. समीर आठल्ये देखील सिनेक्षेत्राशी सबंधीत आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनीही इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)
8 / 9
एका सिनेमाच्या निमित्ताने समीर आणि अलका यांची ओळख झाली होती. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. सुरुवातील अलका यांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.अलका यांच्या आग्रहाखातर घरच्यांनीही लग्नाला होकार दिला.(Photo Instagram)
9 / 9
अलका आणि समीर यांनी दोन मुली आहेत. ईशानी हे त्यांच्या थोरल्या मुलीचे तर कस्तुरी धाकट्या मुलीचे नाव आहे. ईशानी आठल्येने अभिनय क्षेत्रात न येता वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवले होते. .(Photo Instagram)
टॅग्स :अलका कुबलसेलिब्रिटी