Join us
Daily Top 2Weekly Top 5

रंग आणि दिसण्यावरुन लोक खिल्ली उडवायचे, आज 'हा'च सुपरस्टार १५० कोटींच्या घरात राहतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:47 IST

1 / 10
असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी प्रचंड संघर्ष करुन नाव कमावलं आहे. मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्थान निर्माण केलं.
2 / 10
असाच एक सुपरस्टार आहे, ज्यानं वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पण, त्याला अनेकजण 'ऑटो ड्रायव्हर' म्हणत चिडवायचे. पण आता तो १५० कोटी रुपयांच्या घराचा मालक आहे.
3 / 10
एकेकाळी रंग आणि दिसण्यावरुन त्याची खिल्ली उडवली जायची. पण, उत्कृष्ट अभिनय कौशल्यानं त्यानं सर्वांची बोलती बंद केली.
4 / 10
हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नाही तर धनुष आहे. एकेकाळी लोकांच्या टोमण्यांना तोंड देणारा धनुष आज लाखोंच्या हृदयांवर राज्य करतो.
5 / 10
धनुषचा जन्म २८ जुलै १९८३ रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला. त्यांचे खरे नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे.
6 / 10
धनुषच्या घरात सुरुवातीपासूनच चित्रपटमय वातावरण होतें. कारण त्याचे वडील कस्तुरी राजा एक अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून धनुषने २००२ मध्ये 'थुल्लुवाधो इलामाई' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट धनुषच्या वडिलांनी दिग्दर्शित केला होता. धनुष वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी हिरो बनला.
7 / 10
धनुषने एका मुलाखतीत त्याच्या २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कादल कोंडन' चित्रपटाबद्दल सांगितलं. धनुषनं सांगितलं होतं की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या लूकची खिल्ली उडवण्यात आली होती. क्रू मेंबर्स त्याला 'ऑटो ड्रायव्हर' म्हणायचे. धनुष या गोष्टींमुळे खूप अस्वस्थ झाला होता आणि गाडीत बसून प्रचंड रडला होता. पण अभिनेत्याने हिंमत हारली नाही.
8 / 10
धनुषने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो दोन दशकांपासून चित्रपट जगात सक्रिय आहे.
9 / 10
पण, आज धनुष दक्षिणेतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रसिद्धीसोबतच धनुषने भरपूर संपत्तीही कमावली आहे.
10 / 10
त्यांची एकूण संपत्ती २३० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. चेन्नईच्या पोएस गार्डन परिसरात त्यांचे १५० कोटी रुपयांचे घर आहे. मेगास्टार रजनीकांत यांचे घरही याच परिसरामध्ये आहे.
टॅग्स :धनुषसेलिब्रिटीसुंदर गृहनियोजन