रश्मिका असूनही Animal मधील दुसऱ्याच अभिनेत्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 16:40 IST
1 / 7संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित रणबीर कपूरचा Animal नुकताच रिलीज झाला. दोनच दिवसात सिनेमाने १०० कोटी पार केले. सध्या सिनेमाची वाढती क्रेझ पाहता अगदी मध्यरात्रीही शो ठेवण्यात आहे आहेत. अनेक ठिकाणी तर २४ तास थिएटरमध्ये Animal सुरु आहे.2 / 7Animal मधून रणबीर कपूर-रश्मिका मंदाना ही फ्रेश जोडी चाहत्यांना पाहायला मिळत आहे. दोघांच्या लिपलॉकचीही खूप चर्चा झाली. त्यांची केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडली आहे. 3 / 7पण मुख्य अभिनेत्री रश्मिका असली तरी सिनेमात आणखी एक अभिनेत्री आहे. ती म्हणजे तृप्ति डिमरी. सिनेमातील रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरीच्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा आहे. अनेकांना रश्मिकापेक्षा तृप्तीच जास्त आवडली आहे. 4 / 7अनेकांना अभिनेत्री तृप्ती डिमरी माहित आहे. नेटफ्लिक्सवरील 'कला' सिनेमात तिने काम केले. क्रिटिक्सने सिनेमाचं भरपूर कौतुक केलं. तसंच मुख्य भूमिकेत असलेल्या तृप्तीच्या अभिनयाचंही खूप कौतुक केलं गेलं. 5 / 72017 साली तृप्तीने 'मॉम' सिनेमातून करिअरला सुरुवात केली. यामध्ये ती अगदीच छोट्या भूमिकेत होती. यानंतर तिने श्रेयस तळपदेच्या 'पोस्टर बॉईज' मध्येही भूमिका साकारली. शिवाय इम्तियाज अलीच्या 'लैला मजनू' मध्ये ती मुख्य भूमिकेत होती. 6 / 7'बुलबुल' सिनेमातून तिला पहिल्यांदा लोकप्रियता मिळाली. २०२० साली 'बुलबुल' रिलीज झाला होता. अनुष्का शर्माच्या भावानेच हा सिनेमा निर्मित केला होता. तृप्ती आणि अनुष्काचा भाऊ बरेच वर्ष एकमेकांना डेट करत होते. नुकतंच त्यांचं ब्रेकअप झालं आहे.7 / 7तृप्ती डिमरीने तिच्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केलं आहे. तसंच ती कमालीची फीट आहे. योगा करतानाचे अनेक व्हिडिओ ती शेअर करत असते.