Join us

'देऊळ बंद'मधली छोटी 'सना' आठवतेय? आता दिसतेय अशी की ओळखताच येणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:25 IST

1 / 10
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद' ३१ जुलै २०१५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास १० वर्षे झाली आहेत.
2 / 10
गश्मीर महाजनीचा हा सिनेमा प्रवीण तरडेंनी दिग्दर्शित केला होता. एक महान वैज्ञानिक आणि श्री स्वामी समर्थ यांच्यातील द्वंद्व या सिनेमात बघायला मिळालं. हा सिनेमा चांगलाच गाजला
3 / 10
या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा मुख्य भूमिकेत झळकला होता. त्याच्यासह चित्रपटात अभिनेत्री निवेदिता सराफ, मोहन जोशी, श्वेता शिंदे. गिरिजा जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत पाहायला मिळाले होते.
4 / 10
आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. 'देऊळ बंद' चित्रपटात गश्मीरनं राघव शास्त्री नावाच्या वैज्ञानिकाची भूमिका साकारली होती. त्यामध्ये त्याची पत्नी, मुलगी व आई, असं कुटुंब पाहायला मिळालं होतं.
5 / 10
या चित्रपटात त्याची मुलगी सनाच्या भुमिकेत बालकलाकार आर्या घारे दिसली होती. हिच राघव शास्त्रीची मुलगी आता मोठी झाली आहे. आर्या घारे हिने कमी वयातही प्रभावी अभिनय करून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.
6 / 10
आर्या घारे इतकी मोठी झाली आहे की तिला आता ओळखणं कठीण झालं आहे. आर्या घारेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
7 / 10
आर्या घारे आता खूप सुंदर दिसते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून विविध फोटो पोस्ट करत असते.
8 / 10
'देऊळ बंद' या सिनेमाशिवाय आर्या ही 'बंदी शाळा' या सिनेमात देखील झळकली होती. तसेच तिनं सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेतही काम केलं होतं.
9 / 10
आर्या घारे ही अभिनय क्षेत्रात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी मेहनत घेत आहे.
10 / 10
जर तुम्ही अद्याप 'देऊळ बंद' सिनेमा पाहिला नसेल तर तो ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर उपलब्ध आहे. तो तुम्ही घरबसल्या पाहू शकता.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीगश्मिर महाजनी