By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:38 IST
1 / 10दीपिका पादुकोण सध्या प्रेग्नेंसी खूप एन्जॉय करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट आणि फोटो शेअर करत असते. प्रेग्नेंसीमुळे तिची सर्वत्र खूपच चर्चा रंगली आहे. 2 / 10दीपिका नुकतीच प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'कल्की 2898 AD' या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसली होती, ज्याने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे, परंतु अभिनेत्रीशी संबंधित एका माहितीने चाहते हैराण झाले आहेत.3 / 10दीपिका आई झाल्यानंतर कामातून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याबाबत अभिनेत्रीकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र एका एंटरटेन्मेंट पोर्टलनुसार, आई झाल्यानंतर अभिनेत्री मदरहुड जर्नी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. 4 / 10दीपिका त्यामुळेच सध्या कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन करत नाही. याशिवाय, रिपोर्टमध्ये असाही दावा केला जात आहे की अलीकडेच अभिनेत्रीने एक मोठा प्रोजेक्ट साइन करण्यास नकार दिला आहे.5 / 10टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, अलीकडेच दीपिकाला 'द व्हाइट लोटस' या इंटरनॅशनल वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची ऑफर देण्यात आली होती, परंतु अभिनेत्रीने हा प्रोजेक्ट नाकारला होता. 6 / 10असा दावा केला जात आहे की, आई झाल्यानंतर दीपिकाला हँड्स ऑन मॉमी बनायचं आहे. तिला तिचा पूर्ण वेळ तिच्या बाळाला द्यायचा आहे आणि त्याची पूर्ण काळजी घ्यायची आहे. आताही तिचा फोकस बाळाकडेच असतो.7 / 10रिपोर्टनुसार, दीपिका आपल्या मुलासोबत राहण्यासाठी कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन करत नाहीय. याशिवाय रिपोर्ट्सनुसार, दीपिकाला मुलं खूप आवडतात आणि ती लगेच त्यांच्याशी जोडली जाते. 8 / 10दीपिका आणि रणवीरने फेब्रुवारी २०२४ मध्ये बाळ होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर, अभिनेत्री 'कल्की 2898 AD' मध्ये दिसली होती, त्यानंतर ती ॲक्शन डायरेक्टर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. 9 / 1010 / 10