Join us
Daily Top 2Weekly Top 5

'छावा २' येणार? संभाजी महाराजांनंतर आता 'या' शूर योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार विकी कौशल; लक्ष्मण उतेकर करणार दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:49 IST

1 / 10
विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. विकीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय.
2 / 10
विकीने 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. सिनेमातील विकीने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.
3 / 10
'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानं जगभरात ७०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.
4 / 10
निर्माते 'छावा'चा सिक्वेल किंवा त्यापुढील ऐतिहासिक गाथा पडद्यावर आणण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
5 / 10
'ETimes' च्या ताज्या अहवालानुसार, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि मॅडॉक फिल्म्स आता 'छावा २' किंवा एका 'स्पिरिचुअल सिक्वेल'वर काम करण्याची शक्यता आहे.
6 / 10
'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानावर आणि शौर्यावर आधारित होता. आताचा नवीन भाग त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
7 / 10
छत्रपती शाहू महाराज हे संभाजी महाराजांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू होते. त्यांचे बालपण मुघलांच्या कैदेत गेले, मात्र औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची सुटका झाली आणि त्यांनी मराठा साम्राज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली.
8 / 10
सूत्रांच्या माहितीनुसार, विकी कौशल पुन्हा एकदा या ऐतिहासिक भूमिकेत दिसू शकतो, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
9 / 10
निर्मात्यांनी अद्याप 'छावा २' बाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, 'छावा'च्या प्रचंड यशानंतर ऐतिहासिक चित्रपटांची लाट पाहता, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
10 / 10
जर विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकर ही जोडी पुन्हा एकत्र आली, तर तो बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा नवा इतिहास रचेल यात शंका नाही.
टॅग्स :विकी कौशलछत्रपती संभाजी महाराज