Join us
Daily Top 2Weekly Top 5

अचानक ‘प्ले बॅक सिंगिग’मधून निवृत्ती का घेतली? खुद्द अरिजीत सिंग याने सांगितले कारण, म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:18 IST

1 / 12
Arijit Singh Retirement From Playback Singing: मी आता पार्श्वगायन थांबवत आहे. हा एक सुंदर प्रवास होता अशी घोषणा प्रख्यात पार्श्वगायक अरिजित सिंग यांनी केली. त्यांनी हा निर्णय आपल्या कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना घेतला आहे.
2 / 12
सोशल मीडिया पेजवर अरिजीत सिंग यांनी म्हटले की, यापुढे मी पार्श्वगायक म्हणून नवे कामे स्वीकारणार नाही. पण, स्वतंत्रपणे संगीतनिर्मिती सुरू ठेवणार आहे, तसेच हाती असलेली आधीची सर्व कामे पूर्ण करणार आहे. त्यामुळे यावर्षी माझी काही गाणी प्रदर्शित होऊ शकतात. मी चांगल्या संगीताचा चाहता आहे. त्यादृष्टीने भविष्यात आणखी गोष्टी शिकत राहणार आहे.
3 / 12
२००५ मध्ये अरिजित सिंग यांनी 'फेम गुरुकुल' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. त्यानंतर २०११ मध्ये इमरान हाश्मीने भूमिका केलेल्या 'मर्डर २' या चित्रपटातील 'फिर मोहब्बत' या गाण्याद्वारे पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले.
4 / 12
२०१३ मध्ये 'आशिकी २' मधील 'तुम ही हो' या भावस्पर्शी गीतामुळे ते झपाट्याने लोकप्रिय झाले. या गाण्याच्या यशामुळे ते घराघरात पोहोचले. 'चन्ना मेरेया', 'अगर तुम साथ हो', 'राब्ता', 'केसरिया', 'गेरुआ', 'ऐ दिल है मुश्कील' आणि 'चलेया' यासारखी अनेक चार्टबस्टर गाणी गायली.
5 / 12
मराठी, हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगू, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये अरिजीत सिंग यांनी गाणी गायली. अरिजीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अरिजीत सिंग यांनी अचानक ‘प्ले बॅक सिंगिग’ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. परंतु, हा निर्णय का घेतला, याबाबत अरिजीत सिंग यांनी स्वतः माहिती दिली.
6 / 12
अरिजीत सिंग यांनी एक्सवर एक ट्विट करत याबाबत भाष्य केले. हा निर्णय घाईघाईने घेण्यात आला नाही किंवा कोणत्याही एका घटनेमुळे तो घेण्यात आला नाही. फक्त एकच कारण नाही, त्याचे अनेक पैलू आहेत आणि मी बराच काळ त्यावर विचार करत होतो. शेवटी, मी धाडस एकवटले.
7 / 12
अरिजीत सिंग पुढे लिहितात की, याचे कारण खूप सोपे आणि सरळ आहे, आणि ते म्हणजे माझा आता याबाबतचा रस कमी होत आहे. म्हणूनच मी अनेकदा माझ्या गाण्यांचे सूर बदलतो आणि ते लाइव्ह सादर करतो. तर, सत्य हे आहे की मी थकलो आहे. पुढे जाण्यासाठी मला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत वापरून पाहावे लागेल.
8 / 12
देवाची माझ्यावर खूप कृपा आहे. मी चांगल्या संगीताचा चाहता आहे आणि भविष्यात, स्वतः एक छोटा कलाकार म्हणून अधिक शिकत राहीन. अधिक काम करत राहीन. सर्वांच्या पाठिंब्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
9 / 12
माझ्या काही प्रलंबित कमिंटमेंट आहेत, त्या पूर्ण करायच्या आहेत. मी त्यावर काम करेन. तर, या वर्षी तुम्हाला काही रिलीज दिसतील. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मी संगीत सोडणार नाही.
10 / 12
आपल्या आवाजाने लाखो हृदयांवर राज्य करणारा अरिजीत सिंग हा भारतातील सर्वात महागडा गायक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन तासांच्या एका लाईव्ह परफॉर्मन्ससाठी ते १४ कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतात.
11 / 12
इतके मोठे यश मिळवूनही अरिजीतचा स्वभाव अत्यंत विनम्र आहे. ते आपले खाजगी आयुष्य प्रसिद्धीच्या झोतात आणण्याऐवजी साधे जीवन जगण्याला पसंती देतात. अरिजीत सिंग यांची एकूण संपत्ती ४१४ कोटी रुपये आहे. यात नवी मुंबईतील ८ कोटी रुपयांचे आलिशान घर आणि ३.४ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या रेंज रोव्हर आणि मर्सिडीज सारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.
12 / 12
मात्र, इतकी संपत्ती असूनही त्यांचे मुख्य घर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील जियागंजमध्ये आहे. तिथे एका साध्या घरात राहतात. त्याच्या त्या घरात एक स्टुडिओ आहे. अरिजीत आपल्या मूळ गावी एक स्वस्त रेस्टॉरंट चालवतात, ज्याचे नाव Heshel आहे. तिथे फक्त ४० रुपयांत जेवण मिळते. गायनासोबतच तो ब्रँड एंडोर्समेंट आणि कोलॅबोरेशनमधूनही चांगली कमाई करतो.
टॅग्स :अरिजीत सिंहबॉलिवूड