अनुष्का शर्मा आणि विराट कोहली भारत सोडून लंडनला स्थायिक का झाले? आता खरं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:39 IST
1 / 8अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे आहे. सध्या, हे जोडपे लंडनमध्ये स्थायिक आहे, जिथे ते सर्व ग्लॅमरपासून दूर शांत जीवन जगत आहेत. 2 / 8२०२४ मध्ये ते भारताबाहेर गेले होते पण कामाच्या निमित्ताने अजूनही भारतात ये-जा करत असतात. आता, अनुष्का आणि विराटच्या लंडनला जाण्याच्या निर्णयामागील खरे कारण समोर आले आहे.3 / 8माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने हे आरोग्य आणि माहिती सांगणारे यूट्यूब चॅनेल चालवतात. काही महिन्यांपूर्वी, त्यांनी त्यांच्या पॉडकास्टवर प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाचे स्वागत केले. यावेळी दोघांनीही विराट कोहलीचे खूप कौतुक केले.4 / 8अनुष्कासोबतच्या त्यांच्या संभाषणाची आठवण करून देताना डॉ. नेने म्हणाले, 'मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एके दिवशी आम्ही अनुष्कासोबत चर्चा झाली आणि ते खूप मनोरंजक होते. ते लंडनला जाण्याचा विचार करत होते कारण त्यांना (इथे) त्यांचे यश एन्जॉय करता येत नाही. आपण त्यांचे कौतुक करतो, कारण ते जे काही करतात ते लक्ष वेधून घेतात. पण ते एकटे पडतात.'5 / 8श्रीराम नेने यांनी हे देखील सांगितले की सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप होतो जे माधुरीला आवडत नाही. नेने म्हणाले की, 'मी सर्वांशी मिसळतो. मी काळजीमुक्त असतो पण ते आव्हानात्मक देखील असते. नेहमीच एक सेल्फी मोमेंट असतो.'6 / 8श्रीराम नेने पुढे म्हणाले, 'ही वाईट गोष्ट नाहीये पण एक वेळ अशी येते जेव्हा ते खासगी आयुष्यात डोकावतात, जेव्हा तुम्ही डिनर किंवा लंचला जाता, आणि तुम्हाला त्यावेळी शांत राहावे लागते. माझ्या पत्नीसाठी हा एक मुद्दा बनतो पण ते (अनुष्का-विराट कोहली) खूप छान लोक आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांना सामान्य पद्धतीने वाढवायचे आहे.'7 / 8अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पहिली भेट २०१३ मध्ये एका टीव्ही जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले पण त्यांनी त्यांचे नाते लपवून ठेवले. 8 / 8२०१७ मध्ये, त्यांनी इटलीमध्ये लग्न केले. जानेवारी २०२१ मध्ये या जोडप्याने मुलगी वामिकाचे स्वागत केले. नंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये ते मुलगा अकायचे पालक झाले.