आईच्याच सिनेमातून केलं पदार्पण, कोण आहे ही? राष्ट्रीय पुरस्कार विजेती, लग्नाच्या १० वर्षांनी घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:48 IST
1 / 8मनोरंजनविश्वात अनेक स्टारकिड्स आहेत ज्यांच्याबद्दल कायम चर्चा होत असते. पण एक अशी अभिनेत्री आहे जिला कधीच नेपोटिझमवरुन ट्रोल केलं गेलं नाहीये.2 / 8ही अभिनेत्री आपल्या अभिनयाने शिवाय दिग्दर्शन कौशल्यानेही सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. पण ही अभिनेत्री एका ज्येष्ठ अभिनेत्रीची लेक आहे हे खूप कमी जणांना माहित आहे.3 / 8ही आहे सर्वांची लाडकी कोंकणा सेन शर्मा. ज्येष्ठ अभिनेत्री अपर्णा सेन यांची ती मुलगी आहे. आज कोंकणा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचे वडील मुकुल शर्मा हे लेखक आणि पत्रकार होते. 4 / 8ही आहे सर्वांची लाडकी कोंकणा सेन शर्मा. ज्येष्ठ अभिनेत्री अपर्णा सेन यांची ती मुलगी आहे. आज कोंकणा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचे वडील मुकुल शर्मा हे लेखक आणि पत्रकार होते. 5 / 8 यानंतर २००० मध्ये 'एक जे आछे कन्या' या बंगाली सिनेमातून तिने अभिनय केला. त्यातील तिची नकारात्मक भूमिकाही सर्वांच्या लक्षात राहिली.6 / 8२००१ साली आलेल्या 'मिस्टर अँड मिसेस अय्यर' सिनेमामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. यातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 7 / 8'पेज ३','लाईफ इन अ मेट्रो','वेक अप सिड','ओंकारा' अशा अनेक सिनेमांमधून तिने मन जिकलं. नंतर तिने दिग्दर्शनही करायला सुरुवात केली. 'लस्ट स्टोरीज २'मध्ये तिने दिग्दर्शित केलेल्या कथेची खूप स्तुती झाली.8 / 8२०१० मध्ये कोंकणाने रणवीर शौरीसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र २०२० साली त्यांचा घटस्फोट झाला.