Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राजा शिवाजी'मध्ये अभिषेक बच्चनने साकारलेले संभाजी महाराज नेमके कोण? अफजलखानाच्या दगाबाजीमुळे झालेला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 14:36 IST

1 / 9
रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत.
2 / 9
या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
3 / 9
पण, अभिषेक बच्चन साकारत असलेले संभाजी महाराज नेमके कोण? छत्रपती शिवरायांशी त्यांचं काय नातं होतं? जाणून घेऊया.
4 / 9
अभिषेक बच्चने 'राजा शिवाजी'मध्ये साकारलेली भूमिका संभाजी महाराज हे राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांचे थोरले पुत्र होते.
5 / 9
संभाजी महाराजांचा जन्म १६२३ साली झाला होता. ते छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू होते. त्यांचं पूर्ण नाव संभाजी शहाजीराजे भोसले असं होतं.
6 / 9
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संभाजी महाराज आदिलशाहीत मराठा सरदार म्हणून काम करत होते. आदिलशाहीतील लष्करी मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता.
7 / 9
त्यांच्याकडे एक कुशल प्रशासक आणि पराक्रमी योद्धा म्हणून पाहिलं जायचं. शत्रूवर त्यांचा जरब होता.
8 / 9
१९५५ साली कर्नाटकातील कनकगिरी येथे झालेल्या लढाईत अफलजल खानाने दगाफटका केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची इतिहासात नोंद आहे.
9 / 9
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफझल खानाचा केलेला वध यामागे थोरल्या भावाच्या मृत्यूचा बदलाही एक भाग होता, असं म्हटलं जातं.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटअभिषेक बच्चनछत्रपती शिवाजी महाराज