By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:53 IST
1 / 8कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मोनालिसाने पळून जाऊन लग्न केलं आहे. बॉयफ्रेंड फरमान खानसोबत तिने आंतरधर्मीय विवाह केला आहे. 2 / 8मोनालिसा आणि फरमानचे लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. केरळमध्ये जाऊन मोनालिसा आणि फरमानने लग्न केलं. 3 / 8फरमान मुस्लिम असल्याने मोनालिसाच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे मोनालिसाने पळून जाऊन लग्न केलं. 4 / 8केरळमध्ये आधी 'कोर्ट मॅरेज' आणि त्यानंतर तिरुवनंतपुरममधील अरुमनूर नैनार मंदिरात हिंदू रीतिरिवाजांनुसार त्यांनी लग्नगाठ बांधली. 5 / 8मोनालिसाचा नवरा फरमान खान हादेखील एक अभिनेता आहे. तो मॉडेलिंग करतो. 6 / 8फरमान हा मुळचा महाराष्ट्राचा आहे. फेसबुकवर दीडवर्षांपूर्वी मोनालिसा आणि फरमान एकमेकांना भेटले होते. 7 / 8सुरुवातीला त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मात्र नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण त्यांच्या लग्नाला मोनालिसाच्या घरच्यांचा विरोध होता. 8 / 8त्यामुळे त्यांनी पळून जात लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. मोनालिसा आणि फरमान आता काही दिवस केरळमध्ये राहणार आहेत.