Join us  

सिंगर Badshah ची गर्लफ्रेंड आहे प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 5:35 PM

1 / 9
रॅपर आणि गायक बादशाह पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. पत्नीपासून विभक्त झालेल्या बादशाहच्या आयुष्यात पंजाबी अभिनेत्री ईशा रेखीची एंट्री झाली आहे.
2 / 9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बादशाह ईशा रेखीला डेट करत आहे. दोघांचे 1 वर्षापासून अफेअर होते. आतापर्यंत दोघांनीही आपलं नातं लाईमलाईटपासून दूर ठेवणं पसंत केलं आहे.
3 / 9
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, बादशाह ईशा रेखीसोबत रिलेशनशिपमध्ये दोघे. इतकंच नव्हे तर गेली एक वर्ष हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 9
रिपोर्ट्सनुसार, दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 9
बादशाह आणि ईशा रेखीनेही त्यांच्या नात्याबद्दल कुटुंबीयांना सांगितले आहे. दोघांनाही नात्याबाबत कोणतीही निर्णय घाईगडबडीत घ्यायचा नाही आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 9
ईशा एक पंजाबी अभिनेत्री आहे. तिनं 2013 मध्ये Jatt Boys Putt Jattan De या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या सिनेमात ती सिप्पी गिलसोबत दिसली होती. तिने अनेक पंजाबी सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 9
नवाबजादे या चित्रपटातून ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र तिला बॉलिवूडमध्ये फारशी ओळख मिळाली नाही.  (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 9
ईशाचा शेवटची 2019 मध्ये आलेल्या Mindo Taseeldarni चित्रपटात दिसली होती. तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही काम केलं आहे.  (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 9
बादशाह-ईशाच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी पसंती दिली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :बादशहासेलिब्रिटी