Join us

कतरिना कैफसारखी हुबेहूब दिसणारी ही मॉडेल नक्की आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:36 IST

1 / 11
सेलिब्रेटींच्या प्रोफेशनलसोबत खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
2 / 11
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ चर्चेत आली आहे.
3 / 11
एका मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील मॉडेल हुबेहूब कतरिनासारखी दिसते आहे. त्यामुळे चाहतेही संभ्रमात सापडले आहेत.
4 / 11
या मॉडेलचे नाव अलिना राय आहे. तिचे डोळे, चेहऱ्याची ठेवण यामुळे पहिल्यांदा फोटो पाहिल्यावर ती कतरिना कैफ असल्याचे भासते.
5 / 11
टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे अलिना पहिल्यांदा चर्चेत आली होती. कतरिनासारखी दिसत असल्यामुळे तिचे रिल्स प्रचंड व्हायरल झाले होते.
6 / 11
भारतात टिकटॉकवर बंदी आल्यानंतर अलिनाने इन्स्टाग्रामवर रिल्स बनवायला सुरुवात केली.
7 / 11
अलिना सोशल मीडियीवर प्रचंड सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर ७२ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
8 / 11
ग्लॅमरस फोटो अलिना इन्स्टाग्रामवरून शेअर करत असते.
9 / 11
मॉडेलसोबतच अलिना अभिनेत्रीदेखील आहे.रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अलिनाने बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.
10 / 11
‘लखनऊ जंक्शन’ या चित्रपटातून अलिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २८ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
11 / 11
याशिवाय तिने शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे.
टॅग्स :कतरिना कैफ