Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता कुठे आहे आणि काय करतेय प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट दीप्ती भटनागर? कशी दिसते ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 14:56 IST

1 / 11
दीप्ति भटनागर (Deepti Bhatnagar) ९० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट राहिलेली आहे. पॉप्युलर गाणं ‘मेरा लॉन्ग गवाचा’ मधून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या दीप्तिचं वय वाढलं आहे. पण तिचं सौंदर्य अधिक खुलत चाललं आहे. दीप्तिचे काही नवे फोटो समोर आले आहेत.
2 / 11
दीप्ति भटनागर (Deepti Bhatnagar) ने टीव्ही शो 'यात्रा' होस्ट केला होता. त्या शोच्या माध्यमातून ती घराघरात जाऊन पोहोचली होती. देशभरातील मंदिरं आणि धार्मिक स्थळांची तिने माहिती दिली होती. त्यावेळी दीप्तिची साडी आणि तिच्या दागिन्यांची खूप चर्चा व्हायची.
3 / 11
दीप्तिला बघून कुणालाही वाटणार नाही की, ती आता ५४ वर्षांची झाली आहे. कारण ती आधी दिसायची तशीच आताही दिसते. दीप्तिचे फॅन्स तिचे फोटो पाहून तिचं कौतुक करत आहेत.
4 / 11
दीप्तिने साऊथच्या अनेक सिनेमात काम केलं आहे. यात्रा शोशिवाय ती स्टार प्लसवरील 'मुसाफिर हू यारों' शो सुद्धा होस्ट करत होती. या शोमुळेही ती चांगलीच लोकप्रिय झाली.
5 / 11
मात्र त्यानंतर बऱ्याच वर्षांपासून दीप्ति टीव्ही किंवा सिनेमात दिसली नाही. ती एकएकी गायब झाली. पण तिचे फॅन्स मात्र तिला विसरलेले नाहीत. दीप्तिला पाहून कुणालाही अंदाज येणार नाही की, ती ९० च्या दशकातील अभिनेत्री आहे.
6 / 11
दीप्तिचं या वयातही हे खुललेलं सौंदर्य पाहून या सौंदर्याचं रहस्य काय आहे? हे विचारल्याशिवाय राहणार नाही. तिचं जुना म्युझिक व्हिडीओही आजही पाहिला जातो.
7 / 11
दीप्तिने नंतर तिच्या 'मुसाफिर हूं यारो' शोच्या दिग्दर्शकासोबत लग्न केलं. आता ती दीप्ती भटनागर प्रॉडक्शन कंपनी चालवते. या माध्यमातून ती डबिंग, एडिटिंग आणि पोस्ट-प्रॉडक्शनची कामं करते. ती या कंपनीत बिझी आहे.
8 / 11
9 / 11
10 / 11
11 / 11
टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूडसेलिब्रिटी