1 / 5जया बच्चन आणि अमिताभ यांचे लग्न १९७३ मध्ये झाले होते. त्या दोघांच्या लग्नानंतर काहीच वर्षांत रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आले.2 / 5१९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या दो अनजाने या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली असे म्हटले जाते.3 / 5रेखा आणि अमिताभ यांनी राम बलराम या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात रेखा यांच्या ऐवजी जीनत अमान यांना घ्यावे अशी गळ जया बच्चन यांनी निर्मात्यांना घातली होती आणि निर्माते त्यासाठी तयार देखील झाले होते. अखेरीस एकही पैसा न घेता रेखा या चित्रपटात काम करायला तयार झाल्या आणि त्यामुळेच या चित्रपटात रेखा आणि अमिताभ यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली असे म्हटले जाते. 4 / 5राम बलराम या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा प्रचंड प्रसिद्ध आहे. या चित्रपटाच्या सेटला जया यांनी अचानक भेट दिली होती. त्यावेळी रेखा आणि अमिताभ शांतपणे गप्पा मारत बसले होते. त्यामुळे रागाच्या भरात जया यांनी रेखा यांच्या कानाखाली दिली होती असे म्हटले जाते. 5 / 5जया यांनी एका मुलाखतीत या सगळ्या गोष्टी केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. रेखा आणि अमिताभ यांच्यात काही नाते असते तर आज ते माझ्यासोबत नसते असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते.