‘देसी गर्ल’चे जंगी सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST
‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाला अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानिमित्त प्रियांका चोप्राने तिच्या वांद्रे येथील घरी जंगी पार्टीचे आयोजन के ले होते. या पार्टीत बी टाऊनचे तारे-तारका आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार यांनी उपस्थिती नोंदवली होती.
‘देसी गर्ल’चे जंगी सेलिब्रेशन
‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाला अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानिमित्त प्रियांका चोप्राने तिच्या वांद्रे येथील घरी जंगी पार्टीचे आयोजन के ले होते. या पार्टीत बी टाऊनचे तारे-तारका आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार यांनी उपस्थिती नोंदवली होती.पार्टीत प्रियांका चोप्राने एकदम साध्या वेशात एन्ट्री घेतली. आकाशी रंगाच्या स्लिव्हलेस टॉप आणि फ्लॉव्हर प्रिंटेड स्कर्टमध्ये ती आली. तिने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठी कलाकार श्रुती मराठे पार्टीत आली होती. या निळ्या रंगातील तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते. ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे देखील पार्टीत सहभागी झाले होते. त्यांचा डॅशिंग लुक फोटोग्राफर्सनी कॅमेऱ्यात कैद केला. मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने या पार्टीला हजेरी लावली. त्याचा बिअर्ड लुक सगळ्यांसाठी लक्षवेधी ठरला.