Join us  

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : कोणत्या धर्म पद्धतीने होणार विकी-कतरिनाचं लग्न? Vickat च्या लग्नाबाबत महत्वाचा खुलासा....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 12:12 PM

1 / 10
बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरलेला विकी-कतरिनाच्या लग्नसोहळ्याला अवघा एक दिवस बाकी राहिला आहे. ९ डिसेंबर रोजी ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
2 / 10
राजस्थानमधील माधोपूरा जिल्ह्यातील फोर्ट बरवारा येथे मोठ्या थाटात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे सध्या या दोघांकडे लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
3 / 10
सध्या सोशल मीडियावर या लग्नाविषयी अनेक अपड्टेस समोर येत असून नवनवीन खुलासे होत आहेत.
4 / 10
विकी-कतरिनाचा विवाहसोहळा मोठ्या राजेशाही थाटात होणार आहे. अगदी पाहुण्यांच्या स्वागतापासून ते त्यांच्या जेवणापर्यंत अनेक गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आलं आहे.
5 / 10
या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार असून अनेक सेलिब्रिटी आता राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत.
6 / 10
सोशल मीडियावर येत असलेल्या अपड्टेसमध्येच आता या दोघांच्या लग्नाच्या पद्धतीविषयी चर्चा रंगली आहे.
7 / 10
विकी हिंदू असून कतरिना ख्रिश्चन आहे. त्यामुळे या दोघांनी लग्नासाठी नेमकी कोणती धर्म पद्धती निवडली हे जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
8 / 10
सूत्रांच्या माहितीनुसार, विकी आणि कतरिना हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही धर्म पद्धतीनुसार लग्न करणार आहेत.
9 / 10
प्रथम या दोघांचा हिंदू पद्धतीने लग्नसोहळा होईल व त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनेदेखील ते लग्नगाठ बांधणार आहेत.
10 / 10
सध्या कतरिना तिच्या हळदी, संगीत आणि मेहंदी सोहळ्यात बिझी आहे. कतरिनाच्या हातावर खास राजस्थानमधील प्रसिद्ध मेहंदी लागणार आहे. या मेहंदी सोहळ्यासाठी जवळपास ४०० मेहंदीचे कोन मागवण्यात आले आहेत.
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा