Join us
Daily Top 2Weekly Top 5

धमाका!! ओटीटीवर प्रदर्शित होताहेत या नव्या सीरिज, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 07:00 IST

1 / 11
रूद्र - सुपरस्टार अजय देवगण ‘रूद्र’ या वेबसीरिजद्वारे डिजिटल डेब्यू करतोय. त्याची ही वेबसीरिज हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. यात अजयसोबत अजयसोबत इलियाना डिक्रूज मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
2 / 11
फाइंडिंग अनामिका - माधुरी दीक्षित हिचाही डिजिटल डेब्यू होतोय. फाइंडिंग अनामिका या वेबसीरिजमधून ती डेब्यू करतेय. नेटफ्लिक्सच्या या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत संजय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
3 / 11
असूर 2 - अर्शद वारसी, अमेय वाघ, रिद्धी डोगरा यांच्या अभिनयाने सजलेली ‘असूर 2’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या वेबसीरिजचा पहिला सीझन खूपच गाजला होता. आता वूटवर याचा दुसरा सीझन येतोय.
4 / 11
दिल्ली क्राईम 2- या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये तुम्ही शेफाली शाहची शानदार अ‍ॅक्टिंग पाहिली असेलच. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नेटफ्लिक्सवर हा सीझन पाहता येणार आहे.
5 / 11
हुश-हुश - जुही चावला, आयशा जुल्का या दोघांची जोडी हूश -हूश या वेब सीरिजमधून पे्रक्षकांच्या भेटीस येतेय. अ‍ॅमेझॉन प्राईमवरच्या वेब सीरिजमध्ये जुही व आयशाशिवाय कृतिका कामरा, सोहा अली खान देखील दिसणार आहेत.
6 / 11
कोटा फॅक्टरी - जितेंद्र कुमार, मयुर मोरे,एहसास चन्ना आणि रेवती पिल्लई यांच्या प्रमुख भूमिका असलेली टीव्हीएफची ही वेब सीरिज तरूणार्इंना चांगलीच भावली होती. आता या सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
7 / 11
मिसमॅच्ड 2 - रोहित सराफ, प्राजक्ता कोळी, रणविजय सिंघ, विद्या मालवडे यांची ‘मिसमॅच्ड’ ही वेबसीरिज प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आता .याचाही सेकंड सीझन तुमच्या भेटीस येतोय.
8 / 11
मसाबा-मसाबा2 - बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या मुलीच्या जीवनावर आधारित ‘मसाबा-मसाबा’ या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनने चाहत्यांना खिळवून ठेवले होते. आता याचा दुसरा पार्टही लवकरच तुम्हाला पाहता येणार आहे.
9 / 11
लिटिल थिंग्ज - नेटफ्लिक्सवरची ही लव्हस्टोरी चांगलीच गाजली होती. आता याच लव्हस्टोरीचा नवीन पार्ट अर्थात ‘लिटिल थिंग्स 4’ नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
10 / 11
ये काली काली आंखे - श्वेता त्रिपाठी आणि ताहीर राज भसीन यांची मुख्य भूमिका असलेली ही सायकॉलॉजिकल थ्रीलर वेबसीरिजच लवकरच तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकणार आहोत.
11 / 11
कोड मी 2 - जेनिफर विंगेट, रजत कपूर व तरूण विरवानी यांच्या या वेबसीरिजचा दुसरा तुम्ही लवकरच अल्ट बालाजीवर पाहू शकणार आहात.
टॅग्स :वेबसीरिजनेटफ्लिक्स