By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:33 IST
1 / 10बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्री बिझनेसमन सॅम मर्चंटला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.2 / 10तृप्ती अनेक वेळा सॅम मर्चंटसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसली आहे. मात्र तिने कधीही सॅमसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलेले नाही.3 / 10फिल्मफेअरशी झालेल्या संभाषणादरम्यान तृप्तीला सॅमसोबतच्या डेटिंगच्या रुमर्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीने उत्तर दिलं.4 / 10'रिलेशनशिपमध्ये असण्याची गरज नाही, कारण आपली एक अट असते की जर आयुष्यात कोणतंही रिलेशनशिप नसेल तर काहीतरी गडबड आहे.'5 / 10'आपल्यातच काहीतरी कमतरता आहे असं अनेकदा वाटतं. पण तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही' असं तृप्तीने म्हटलं आहे. 6 / 10अभिनेत्रीने पुढे स्पष्ट केलं की तिच्या 'बुलबुल' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिला समजावलं की सिंगल राहण्यात काहीच चूक नाही.7 / 10''बुलबुल' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मला शिकवलं की, तुमच्या आयुष्यात रोमान्स करण्यासाठी कोणी नाही यात काहीच गैर नाही.8 / 10'कारण तुम्ही इतर अनेक गोष्टी करू शकता. त्यामुळे या एका गोष्टीबद्दल दुःखी का व्हावं?' असंही तृप्ती डिमरीने म्हटलं आहे. 9 / 10तृप्तीने सॅम मर्चंटसोबतच्या तिच्या नात्याबद्दल थेट बोलली नाही. ती 'धडक २' चित्रपटात दिसली होती. तिचे असंख्य चाहते आहेत. 10 / 10