By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 18:55 IST
1 / 11अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. ती बिझनेसमन सोहेल कथुरियासोबत लग्न करणार आहे. ४ डिसेंबरला हंसिका कायमची सोहेलची होणार आहे. हंसिका मोटवानी हे साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. तिचा नवराही मोठा उद्योगपती आहे.2 / 11हंसिकाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. हंसिकाने केवळ साऊथचेच नाही तर हिंदी मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे.3 / 11सोहेल आणि हंसिका एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. ते व्यावसायिक भागीदार देखील आहेत. त्यांनी एकत्र अनेक इव्हेंट्सचे प्लानिंग केले आहे. 4 / 11सोहेल हा मुंबई स्थित व्यापारी आहे. हंसिका आणि सोहेल एकत्र काम करताना प्रेमात पडले. सोहेलचा कापड्याचाही व्यवसाय आहे.5 / 11हंसिकासोबत सोहेलचे हे दुसरे लग्न असेल. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रिंकी बजाज आहे. दोघांच्या लग्नात हंसिकाही सहभागी झाली होती. सोहेलचे पहिले लग्न तुटल्यानंतर त्याचे हंसिकावर प्रेम जडले.6 / 11सोहेल खूप रोमँटिक आहे. त्याने हंसिकाला फिल्मी अंदाजात प्रपोझ केले होते. 7 / 11सोहेलने हंसिकाला आयफेल टॉवरसमोर लग्नासाठी प्रपोज केले. गुडघ्यावर बसून, सोहेलने आपल्या लेडीलव्हला अंगठी घातली.8 / 11हंसिका मोटवानी आणि सोहेलचा शाही विवाह सोहळा जयपूरच्या मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये होणार आहे. लग्नापूर्वीचे उत्सव सुरू झाले आहेत. मंगळवारी माता की चौकीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जिथे हंसिका आणि सोहेल लाल रंगाच्या आउटफिटमध्ये दिसले.9 / 11माता की चौकीमध्ये हंसिकाने लाल रंगाची साडी नेसली होती. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. 10 / 11हंसिकाच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो स्पष्ट दिसत होता. हंसिकाने चोकर नेकपीस, कानातले, मांग टिकासह लाल साडी कॅरी केली होती. सोहेलने त्याच्या लेडीलव्हच्या लाल साडीसोबत मॅचिंग कुर्ता घातला होता. हंसिका आणि सोहेलचा एकत्र रोमँटिक फोटो व्हायरल होत आहे.11 / 11लग्नाआधी २ डिसेंबरला जयपूरमध्ये सुफी नाइटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.