‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:50 IST
1 / 2१९९४ साली प्रदर्शित झालेल्या मोहरा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळवलं होतं. सुनील शेट्टी, अक्षय कुमार असे स्टार कलाकार असलेल्या या चित्रपटातील गाणी अजूनही चाहत्यांच्या ओठावर सहजपणे येतात. दरम्यान, या चित्रपटात पूनम झावर ही अभिनेत्री सुनील शेट्टीसोबत रोमान्स करताना दिसली होती.2 / 2पूनम झावर हिने मोहरा चित्रपटाव्यतिरिक्त इतर अनेक चित्रपटांमधून काम केलं होतं. मात्र तिला खरी ओळख ही मोहरा चित्रपटातूनच मिळाली होती.पूनम हिने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त दक्षिणेतील अनेक चित्रपटांमधूनही काम केलं होतं. मात्र त्यानंतर ती चित्रपटांमधून अचानक गायब झाली होती. आता तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे.