Join us

'इश्क विश्क'मध्ये शाहिदसोबत रोमांस करणाऱ्या अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, आता दिसते अशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:28 IST

1 / 9
अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये येतात आणि त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धीझोतात येतात. पण मग पुढचा प्रवास खडतर होऊ लागतो आणि हळूहळू कलाकार इंडस्ट्रीला रामराम करतात. अभिनेत्री शहनाज ट्रेझरीवाला त्यापैकीच एक.
2 / 9
शहनाज ट्रेझरीवालाने इश्क विश्क या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात ती शाहिद कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती. शहनाज ट्रेझरीवालाही चर्चेत आली. पण नंतर ती इंडस्ट्रीत काही खास करू शकली नाही आणि गायब झाली.
3 / 9
शहनाज ट्रेझरीवाला यांनी मॉडेलिंगपासून सुरुवात केली. शहनाज ट्रेझरीवाला पहिल्यांदा २००१ साली तेलुगू चित्रपट एदुरुलेनी मनिषीमध्ये दिसली होती. यानंतर २००३ मध्ये ती इश्क विश्कमध्ये दिसली होती. या चित्रपटात ती शाहिदसोबत झळकली होती. त्यांचे चोट दिल पर लगी हे गाणे खूप लोकप्रिय झाले.
4 / 9
या चित्रपटात शहनाजने फॅशन स्टेटमेंट सेट केले होते. या चित्रपटात अमृता रावही दिसली होती.
5 / 9
त्यानंतर शहनाज ट्रेझरीवाला हम तुम, उमर, आगे से राइट, रेडिओ, लव्ह का द एंड, दिल्ली बेली, आणि मिस्टर राइट, द बिग सिक, मुन्ना मायकल आणि कालाकांडी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, तिची कारकीर्द फ्लॉप ठरली.
6 / 9
शहनाज ट्रेझरीवाला शेवटची २०१८ साली बॉलिवूड चित्रपटात दिसली होती. याशिवाय २०२१ मध्ये ती अमेरिकनिश (Americanish) या इंग्रजी चित्रपटात दिसली होती.
7 / 9
आता शहनाज ट्रेझरीवाला चित्रपट सोडून व्हिडीओ क्रिएटर बनली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि व्लॉगिंगही करते. इंस्टाग्रामवर तिचे १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
8 / 9
शहनाज इन्स्टाग्रामवर रील व्हिडीओ देखील बनवते. तिचे व्हिडिओ माहितीपूर्ण आहेत.
9 / 9
तिला प्रवासाची आवड आहे. त्याच्या प्रवासाचे व्हिडिओ आणि फोटोही खूप चर्चेत आहेत.