Join us

फरदीन खानच्या 'जानशीन' सिनेमातील अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 17:29 IST

1 / 10
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार झाले आहेत, ज्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र, नंतर ते सिनेइंडस्ट्रीपासून दुरावले. अशाच एका कलाकारामध्ये अभिनेत्री सेलिना जेटलीच्या नावाचाही समावेश आहे, जिला तिच्या पहिल्याच चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली होती.
2 / 10
सेलिना जेटलीने २००३ मध्ये 'जानशीन' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता फरदीन खान मुख्य अभिनेता म्हणून दिसला होता.
3 / 10
जानशीन या चित्रपटातील सेलिनाची स्टाईल सर्वांनाच आवडली. या चित्रपटातही ती बिकिनी लूकमध्ये दिसली होती.
4 / 10
सेलिनाने जानशीनच्या माध्यमातून खळबळ माजवली होती आणि तिने थेट लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
5 / 10
लोक सेलिनाच्या सौंदर्याचे वेडे झाले होते. इतकंच नाही तर सिनेजगतात पाऊल ठेवण्यापूर्वी ती २००१ मध्ये मिस इंडिया युनिव्हर्सही बनली होती.
6 / 10
जानशीननंतर सेलिना 'गोलमाल रिटर्न्स', 'नो एंट्री' आणि 'अपना सपना मनी मनी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. पण त्यानंतर तिने लग्न केले आणि चित्रपटांच्या दुनियेपासून दुरावले.
7 / 10
सेलिना जेटलीने २०११ मध्ये पीटर हागसोबत लग्न केले. पीटर हा ऑस्ट्रियन व्यापारी आहे. लग्न झाल्यापासून सेलिना ऑस्ट्रेलियात राहते. ती तीन मुलांची आई देखील आहे.
8 / 10
सेलिना बॉलीवूडपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या फोटोंमुळे ती चर्चेत असते.
9 / 10
सेलिना जेटलीने शेअर केलेले फोटो पाहून असे दिसते की तिचा लूक आधीच बदलला आहे, पण तरीही ती खूपच सुंदर दिसते.
10 / 10
ती ४१ वर्षांची आहे, पण तिचे सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अजिबात अंदाज लावता येत नाही.
टॅग्स :सेलिना जेटलीफरदीन खान