साऊथची ही बाला बनलीये नवी ‘इंटरनेट सेन्सेशन’! अथुल्या रवीचे फोटो पाहाल तर पाहातच राहाल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 14:38 IST
1 / 10साऊथच्या अनेक अभिनेत्रींनी सध्या चाहत्यांना वेड लावलं आहे. साऊथच्या या बाला आता बॉलिवूड अभिनेत्रींनाही मात देत आहेत. अशीच साऊथची एक ब्युटी म्हणजे अथुल्या रवी.2 / 10तामिळ अभिनेत्री अथुल्या रवी हिच्या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातलला आहे. तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.3 / 10अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस लुकसाठी ती ओळखली जाते. साडीतील तिच्या अदाही वेड लावणाºया आहेत.4 / 10गेल्या पाच वर्षांपासून तामिळ फिल्म इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह असलेली अथुल्या सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह आहे. आत्तापर्यंत अनेक चित्रपटांत ती झळकली आहे.5 / 10पलवाडी कढाई या शॉर्ट फिल्ममधून तिचा अभिनय प्रवास सुरू झाला आणि 2017 मध्ये तिला पहिला मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर तिने कधीच मागे वळून बधितलं नाही.6 / 10 Kadhal Kan Kattudhe या डेब्यू सिनेमात ती पहिल्यांदा लीड अॅक्ट्रेस म्हणून झळकली. पहिल्याच चित्रपटानंतर तिची चर्चा सुरू झाली.7 / 10यानंतर तिच्याकडे निर्माता-दिग्दर्शकांच्या रांगा लागल्या. आत्तापर्यंत 10 चित्रपटांत झळकलेली अथुल्या आता तामिळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.8 / 10सोशल मीडियावर अथुल्या तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.9 / 10तिच्या मनमोहक हास्यावर चाहते फिदा आहेत. विशेषत: साडीतील तिचे फोटो चाहत्यांना वेड लावतात.10 / 10कोइंबतूरमध्ये राहणारी अथुल्या माहिती तंत्रज्ञान विषयात पदवीधर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने करिअर म्हणून अभिनय क्षेत्राची निवड केली.