Join us

Tamannaah Bhatia : "चमत्काराची वाट पाहू नका..."; विजय वर्मासोबत झालं ब्रेकअप? तमन्ना भाटियाची क्रिप्टिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:23 IST

1 / 9
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक मानले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा पसरत आहेत.
2 / 9
विजय वर्मासोबत ब्रेकअपच्या अफवांदरम्यान तमन्नाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
3 / 9
4 / 9
तमन्नाच्या या पोस्टने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. तमन्ना किंवा विजय दोघांनीही त्यांच्या नात्यातील दुराव्याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
5 / 9
काही रिपोर्टनुसार तमन्ना लग्नासाठी खूप उत्सुक होती. मात्र विजय सध्या त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू इच्छित होता. यामुळे त्यांच्यात मतभेद झाले असल्याचं म्हटलं जात आहे.
6 / 9
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडीने नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरीज २' मध्ये सुजॉय घोषच्या सेगमेंटमध्ये एकत्र काम केले होते.
7 / 9
जून २०२३ मध्ये फिल्म कंपॅनियनला दिलेल्या मुलाखतीत तमन्नाने अखेर विजयसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी केली. नंतर विजय वर्मानेही त्यांच्या नात्याची घोषणा केली.
8 / 9
तमन्ना भाटिया ही सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.
9 / 9
टॅग्स :तमन्ना भाटियाबॉलिवूड