Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारा रम पम' मधील दोन चिमुकले आता कसे दिसतात? ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 15:17 IST

1 / 6
2007 साली म्हणजेच तब्बल १७ वर्षांपूर्वी आलेला 'तारा रम पम' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. लहान मुलांचा तर हा अगदी आवडीचा सिनेमा. कार रेसिंगवर आधारित असलेला हा कौटुंबिक सिनेमा आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे.
2 / 6
सैफ अली खान आणि राणी मुखर्जीने यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तसंच जावेद जाफरीचीही भूमिका होती. सैफ-राणीची लव्हस्टोरी सर्वांनाच भावली.
3 / 6
यासोबतच सिनेमातील दोन बालकलाकारांनीही लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी सैफ आणि राणीच्या मुलांची भूमिका साकारली होती. प्रिया आणि रणवीर अशी या दोन चिमुकल्यांची नावं होती.
4 / 6
अभिनेत्री एंजेलिना इदनानीने प्रिया या मोठ्या मुलीची भूमिका साकारली. तर बालकलाकार अली हाजी रणवीरच्या भूमिकेत दिसला. दोघांनी याआधीही काही सिनेमांमध्ये काम केलं होतं. आता हे दोघंही कसे दिसतात आणि काय करतात माहितीये का?
5 / 6
अभिनेत्री एंजेलिना आता मोठी झाली असून खूपच ग्लॅमरस दिसते. सिंगापूरमध्ये तिने उच्च शिक्षण घेतलं. फॅशन मार्केटिंगमध्ये तिने करिअर केलं आहे. एंजेलिना आता सिनेसृष्टीपासून दूर आहे.
6 / 6
दुसरीकडे क्युट दिसणारा अली आता एकदम हँडसम दिसतो. अलीने अभिनय सोडून दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. त्याची पास्टिश पिक्चर्स ही प्रोडक्शन कंपनीही आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसैफ अली खान राणी मुखर्जी