Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कृष्णातारम'मधल्या राधाच्या प्रेमात पडले प्रेक्षक, आवाजानेही घातली भुरळ; कोण आहे ही अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 10:07 IST

1 / 8
सिनेमॅटिकली आणि म्युझिकली हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. अभिनेता सिद्धार्थ गुप्ता श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहे. तर राधाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण माहितीये का?
2 / 8
हार्दिक गज्जर दिग्दर्शित 'कृष्णावतारम पार्ट १' सिनेमाची सध्या चर्चा आहे. सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षक राधा-कृष्णाच्या या प्रेमकहाणीच्या प्रेमातच पडले आहेत.
3 / 8
सिनेमातील राधाच्या सौंदर्याची, अभिनयावर प्रेक्षक फिदा झाले आहेत. मात्र तिचा गोड आवाज थिएटरमध्ये वेगळीच जादू करत आहे. तिच्या आवाजात कृष्णावरचं प्रेम, विरहातील दु:ख स्पष्ट जाणवत आहे.
4 / 8
राधाची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे सुष्मिता भट. ३२ वर्षीय सुष्मिता साउथमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'तुलसी' या गाण्यातून ती लोकप्रिय झाली होती.
5 / 8
कन्नड सिनेमात ओळख मिळवल्यानंतर तिने तमिळमध्ये पदार्पण केलं. विक्रम प्रभू यांच्यासोबत 'लव्ह मॅरेज' आणि मल्याळममध्ये 'डोमिनिक अँड द लेडीज पर्स', 'डीज इराए' या सिनेमांमध्ये तिने काम केलं.
6 / 8
नाट्यम तेलुगू सिनेमातून तिच्या करिअरला सुरुवात झाली होती. तिने मामूटी, मोहनलाल यांच्यासोबतही स्क्रीन शेअर केली आहे.
7 / 8
सुष्मिता शास्त्रीय नृत्यात पारंगत आहे. मामूटी यांच्या 'मार्गाजी' सिनेमातील गाण्यात तिचा डान्स खूप व्हायरल झाला.
8 / 8
'कृष्णावरताम पार्ट १' मधून आता ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. ही राधा कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड