विवाहित असूनही या अभिनेत्रींसोबत सनी देओल होता रिलेशनशीपमध्ये, नाव वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:14 IST
1 / 9सनी देओल सध्या त्याच्या 'जाट' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.2 / 9व्यावसायिक आयुष्यापेक्षा लव्ह लाइफमुळे चर्चेत असणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेता सनी देओलच्या नावाचाही समावेश आहे. या अभिनेत्याचे नाव आतापर्यंत अनेक सुंदरींशी जोडले गेले आहे. 3 / 9या यादीत पहिले नाव आहे डिंपल कपाडियाचे. जिने सनीसोबत अनेक सुपरहिट चित्रपट केले आणि याच काळात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.4 / 9सनी देओल त्याच्या पहिला चित्रपट 'बेताब'मधील अभिनेत्री अमृता सिंगच्याही प्रेमात पडला होता. तेव्हा अमृताला माहित नव्हतं की सनी विवाहित आहे. अभिनेत्रीला हे कळताच तिने सनीसोबतचे सर्व संबंध तोडले.5 / 9सुरुवातीच्या काळात सनी देओल हा बॉलिवूडमधला सर्वात आवडता नायक मानला जात असे. त्याने रवीनासोबतही खूप काम केले आहे. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या अनेक बातम्याही बाहेर आल्या. मात्र, सनीचे हे प्रेम प्रकरणही फार काळ टिकले नाही.6 / 9सनी देओलने अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीसोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 'डकैत' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. पण सनीच्या लग्नामुळे त्यांचे नातेही तुटले.7 / 9सनी देओलने १९८४ मध्ये त्याची पत्नी पूजाशी लग्न केले होते. त्यावेळी या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पणही केले नव्हते. हे जोडपे दोन मुलांचे पालक आहेत.8 / 9वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सनी देओल शेवटचा 'गदर २' चित्रपटात दिसला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा कमावला.9 / 9वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सनी देओल शेवटचा 'गदर २' चित्रपटात दिसला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा कमावला.