Join us

संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:08 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचं गुरुवारी(१२ जून) रात्री निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते.
2 / 10
पोलो गेम खेळत असताना हृदविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे.संजय कपूर यांच्या निधनाने कपूर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
3 / 10
करिश्मा कपूर हिने २००३ मध्ये बिझनेसमन संजय कपूर यांच्याशी लग्न करत संसार थाटला होता. पण, लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्यात खटके उडू लागले होते.
4 / 10
करिश्मा आणि संजय यांना कियान आणि समायरा ही दोन मुले आहेत. पण, मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट घेत ते वेगळे झाले.
5 / 10
करिश्माने संजय यांच्यावर घरगुती हिंसाचारासारखे गंभीर आरोप केले होते. तर संजय कपूर यांनी करिश्माला गोल्ड डिगर म्हणत तिने फक्त पैशांसाठी लग्न केल्याचा आरोप केला होता.
6 / 10
घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्रीला मुलांच्या कस्टडीसोबतच पोटगी म्हणून मोठी रक्कम मिळाली होती.
7 / 10
मीडिया रिपोर्टनुसार, करिश्माला पोटगीमध्ये ७० कोटी इतकी रक्कम संजय कपूर यांनी दिली होती.
8 / 10
याशिवाय त्यांनी त्यांच्या वडिलांचा बंगलाही अभिनेत्रीच्या नावावर केला होता. त्यासोबतच संजय यांनी मुलांच्या भवितव्याचीही काळजी घेतली होती.
9 / 10
त्यांनी दोन्ही मुलांच्या नावे १४ कोटींचे बॉन्ड खरेदी केले होते. ज्यावर दर महिन्याला १० लाख रुपये व्याज मिळत होतं.
10 / 10
मुलगी समायराचा १८वा वाढदिवस करिश्मा आणि संजय यांनी एकत्र साजरा केला होता.
टॅग्स :करिश्मा कपूरसेलिब्रिटी