Join us
Daily Top 2Weekly Top 5

"फक्त एक नवराच...", वाढदिवसाला भावूक झाली अभिनेत्री; नवऱ्याने दिलं 'असं' खास सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 14:40 IST

1 / 14
साऊथ अभिनेत्री महालक्ष्मीने निर्माता रविंद्र चंद्रशेखरनसोबत लग्न केलं आहे. त्यांचं लग्न सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. महालक्ष्मीचं हे दुसरं लग्न आहे. सोशल मीडियावर या लग्नाची नेहमीच जोरदार चर्चा होत असते.
2 / 14
काही नेटिझन्स त्यांच्या जोडीला अनमॅच्ड म्हणतात. त्यामुळे कधी कधी लोक त्यांना खूप ट्रोल देखील करतात. याच दरम्यान अभिनेत्रीने आपला 36 वा वाढदिवस अगदी आनंदात साजरा केला आहे.
3 / 14
पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या पतीने दिले खूप खास सरप्राइज दिलं आहे. रविंद्रने महालक्ष्मीच्या वाढदिवसासाठी रुममध्ये खूप सुंदररित्या डेकोरेशन केलं होतं. तसेच काही भेटवस्तू देखील ठेवल्या होत्या.
4 / 14
पतीने दिलेलं सरप्राइज पाहून महालक्ष्मी इमोशनल झाली. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिने आपल्या भावना व्यक्त करणारी एक पोस्ट लिहीली आहे. माझ्याकडे सर्वकाही आहे अम्मू... ही फुलं माझ्यासाठी खूप किमती आहेत असंही म्हटलं आहे.
5 / 14
तुम्ही सर्वांना सर्व प्रकारचं गिफ्ट देऊ शकता पण एक नवराच असतो जो आपल्या बायकोला फुलं गिफ्ट करू शकतो. मी खूप खूश आहे. माझ्यासाठी तू देवाने दिलेलं आयुष्यातलं सर्वात चांगलं गिफ्ट आहे. लव्ह यू अम्मू असं महालक्ष्मीनेने म्हटलं आहे.
6 / 14
अभिनेत्री महालक्ष्मीच्या या पोस्टला पती रविंद्रने प्रेमाने रिएक्शन देच तमिळ भाषेत रिप्लाय केला आहे. महालक्ष्मी आणि रविंद्र यांना सोशल मीडिया युजर्सची कधीच भीती वाटली नाही. ते दोघंही नेहमीच इंटरनेटवर आपले प्रेम व्यक्त करत असतात.
7 / 14
दोघांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडली नाही. महालक्ष्मी आणि रविंद्र यांच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याचे सहा महिने आनंदात घालवले आहेत. याच निमित्ताने घरी खास पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं.
8 / 14
महालक्ष्मी आणि रवींद्र शादी यांच्या लग्नाची पहिल्या दिवसापासूनच चर्चा आहे. त्यांचे हनिमूनचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यांना नेहमीच ट्रोल करण्यात येतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 14
महालक्ष्मी आणि तिचा पती-निर्माता रविंद्र चंद्रशेखरन याची नेहमीच चर्चा रंगली असते. काही दिवसांपूर्वी रविंद्रने आपल्या सुंदर पत्नीसाठी एक खास पोस्ट लिहून तिचे आठवे आश्चर्य म्हणून वर्णन केलं होतं.
10 / 14
रविंद्रने पत्नी महालक्ष्मीसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट केली होती. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला असून यावेळीही दोघांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले होते. याच दरम्यान, त्यांची एक जुनी पोस्टही व्हायरल झाली होती.
11 / 14
12 / 14
13 / 14
14 / 14
टॅग्स :Tollywood